गेवराई तालुक्यातील खोरी तांडा येथे रत्याच्या कामाला मंजुरी मिळाली या रस्त्याचे 13 लक्ष रुपये मंजूर झाले त्यापैकी 2 लक्ष रुपये कुशल कामावर व 6 लक्ष रुपये अकुशल कामावर खर्च दाखवण्यात आले. वास्तविक पाहता कुठलेही काम न करता संबंधित गुत्तेदाराने 8 लक्ष रुपये उचलले या कामास मंजुरी मिळून दोन वर्ष पूर्ण होऊन हि खोरी तांडा येथील रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शासनाचे व प्रशासनाचे कामाकडे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोर सेना तालुका प्रमुख सतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रसिद्ध प्रमुख छगन पवार, सर्कल कोषाध्यक्ष प्रकाश पवार, अंकुश जाधव, विलास चव्हाण, मसुराम पवार, बाजीराव पवार, हरी पवार, लहू महाराज, तुकाराम महाराज, आसाराम राठोड, संजय चव्हाण या गोर सैनिकांनी अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोर सेनेचे पदाधिकारी 1 में रोजी उपोषणास बदले होते. उपोषण तब्बल चार दिवस चालल्या नंतर प्रशासनाला जाग आली व जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी कमीटी नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कमिटीमधील उप कार्यकारी अभियंता व बी.डी.ओ. प्रत्यक्ष लक्ष घालून स्थळ पंचनामा करून महत्वाची भूमिका पार पाडली. खोरी तांड्यातील गावकऱ्यांना 15 में पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच या कामामध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे लेकी आश्वासन देण्यात आले.
त्यांनंतर गोर सैनिकांनी गोर सेनेचे मराठवाडा प्रमुख आदरणीय रविकांत भाऊ राठोड, विजय नायक, उपजिल्हा प्रमुख अरुण भाऊ पवार, जिल्हा सहसचिव अनिल भाऊ राठोड, अर्जुन भाऊ राठोड, बिबिशन भाऊ राठोड, वडवणी तालुका प्रमुख अप्पासाहेब पवार, बीड तालुका प्रमुख भगतसिंग भाऊ राठोड यांच्या उपस्थित अमरण उपोषण माघे घेण्यात आले…..
Editor: Govind Rathod