गोर स्त्रीयांची रडण्याची एक जगा वेगळी अदभुत प्रथा, भीमणीपुत्र मोहन गणुजी नायिक

वाते मुंगा मोलारी
My swan song

गोर स्त्रीयांची रडण्याची एक जगा वेगळी अदभुत प्रथा, भीमणीपुत्र मोहन गणुजी नायिक

सर्व समाजातील स्त्रिया लग्न प्रसंगी अथवा दु:खद प्रसंगी रडतात;परंतु गोर स्त्रियांचे रडमे मात्र गीतासह असते.येथेही गोर संस्कृतीने आपले जगा वेगळे अदभुत रुप आजतागायत जपून ठेवले आहे म्हणूनच गोरमाटी संस्कृतीला वाड;मयीन संस्कृती हे नाव सुसंगत ठरते.
*ओठांवर गीत आणि डोळ्यात अश्रू घेऊन बैलाच्या पाठीवर बसून सासरी जाणारी नव वधू जगाच्या पाठीवर गोर संस्कृती शिवाय अन्य संस्कृतीत शोधूनही सापडणार नाही*
गोर स्त्रियांचे गाणे गात रडण्याचे तिन प्रकार गोर संस्कृतीत आढळून येतात.ढावलो,मळणो आणि हावेली नावाचे असे गाणे गात रडण्याचे तिन प्रकार प्रचलित आहेत.या तिन प्रकारच्या माध्यमातून गोर स्त्रिया विशिष्ट हेल काढत आपल्या दु;खद भावना व्यक्त करतात.गाणे गात रडणे,रडत रडत गाणे हे या गोर संस्कृतीचे अदभुत रहस्य आहे.

*मळ्णो*- मळ्णो म्हणजे मिलन होय.दोन स्त्रियांच्या गळा धरून रडण्याच्या प्रथेस ‘मळ्णो’ म्हणतात.दोन स्त्रिया एकमेकांना भेटल्यास कि, एकमेकींचा गळा धरून काव्यात्मक आपल्या दु:खद भावना व्यक्त करतात.दोन स्त्रिया एकमेकींचा गळा धरुन रडत असताना तिसरी एखादी स्त्री त्या रडणार्या दोन्ही स्त्रियांच्या डोक्यावर हात ठेऊन उभी असते.तीही पण अश्रू ढाळीत असते.हा काव्य प्रकार इतका करुण असतो की, श्रवण करणारेही अश्रू ढाळत असतात.हे या मळ्णो या प्रथेचे वैशिष्ट्य होय.या प्रक्रियेत दोन दोन्ही स्त्रियाच असावेत असे नाही तर पुरुषांचे गळा धरुन स्त्रीया रडतात;परंतु पुरुष मात्र नुसते अश्रू ढाळीत असतो.
नवरी वधूचे *मळ्णो* मात्र या पेक्षा सर्व अर्थाने भिन्न असते.नवरी वधू आपल्या सम वयस्करांचे गळा धरुन रडते तर वडीलधार्यांचे कंबरेला आपल्या दोन्ही हाताने मिठ्ठी मारुन रडते अशा प्रकारच्या या रडण्याच्या प्रथेलाही ‘मळ्णो’ म्हणतात.

*ढावलो*- धाव, धावा करणे या शब्दा पासून ‘ढावलो’या शब्दाची व्युत्पत्ती संभवते.दु:खद प्रसंगी किंवा आप्त संबंधातील व्यक्तीच्या निधन प्रसंगी त्या व्यक्तीचे काव्यात्मक गुण गाऊन रडण्याच्या प्रथेस ‘ढावलो’ हे संबोधन आहे.ढावलोच्या माध्यमातून दु:खद भावना व्यक्त करण्यासाठी स्त्री मात्र एकटी असावी लागते. यात भाग घेणार्या अधिक स्त्रीया असल्या तरी प्रत्येकीने स्वतंत्ररीत्या ढावलो गीताच्या माध्यमातून आपल्या दु:खद भावना व्यक्त करीत असतात हे ढावलोचे वैशिष्ट्य होय.

*हावेली*- “वाते मुंगा मोलारी” च्या मागील सदरात ‘ हावेलीच्या संदर्भात सविस्तर विस्तारपूर्ण चर्चा झालेली आहे येथे स्थल संकोचामुळे विस्तारपूर्ण चर्चा करता येणार नाही.जेष्ठ अभ्यासक निरज साळुंखे या संदर्भात म्हणतात की, लग्नातील गोर स्त्रियांचे रडणे हे गीतासह असून ते प्रामुख्याने पावासा संबंधीत असतात.हे त्यांचे म्हणणे वास्तव आहे.गोर स्त्रियांच्या रडण्याच्या प्रथेचा अभ्यास करताना याची खात्री पटते.
एकंदरीत गोरमाटी संस्कृतीतील *हावेली* ही रुढ प्रथा नैसर्गिक घटकांच्या वागणूकीचे प्रतिकात्मक अनुकरणाचे symbolic उत्कृष्ट उदाहरण असून निसर्गाला घालायेचे हे साकडे होय येवढे मात्र खरे..!

*संदर्भ*-
गोरमाटी संस्कृती आणि संकेत
भीमणीपुत्र
प्रकाशक-
सौ.शेवंती मोहन नाईक
2,दैत्य बळी कुंतल देश महाराष्ट्र
निरज साहित्य

भीमणीपुत्र
मोहन गणुजी नायिक

प्रमुख प्रतिनिधी. रविराज एस. पवार 8976305533