ग.नु जाधव यांना आदर्श पुरस्कारने सन्मानीत

किनवट – येथुनच जवळ असलेल्या घोटी केंद्रांतर्गत जि.प.प्रा.शा.मलकापुर येथील सहशिक्षक तथा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना किनवटचे तालुकाध्यक्ष ग.नु.जाधव यांना जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार दि. 24 ऑगस्ट रोजी मुखेड येथे पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते व आ.विक्रम काळे, आ.हनमंतराव पाटील बेटोगरेकर, जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटोगरेकर, शिक्षण सभापती संजय पाटील कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यातआला. त्यांनी संपुर्ण स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छतादूत, विविध प्रशिक्षणात साधनव्यक्ती, शालेय स्तरावर विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी केलेले विविध उपक्रम या सर्व बाबीची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आ.प्रदीप नाईक, जि.प.उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, जि.प.सदस्य बंडु नाईक, पंचायत समिती सभापती श्रीमती गजुबाइ मोदे, गटशिक्षणाधिकारी डी.जी.दवणे, विस्तार अधिकारी आर.एल.आडे, विस्तार अधिकारी शंकर राठोड, विस्तार अधिकारी अनिल महामुने, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवकांबळे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे विभागीय सचिव अनिल दुगाने, जिल्हा उपाध्यक्ष अनिल गुंजकर, शेख रहिमोद्दीन, तालुकाउपाध्यक्ष विठ्ठल राठोड, गजेंद्र बोड्डेवार, रमेश आंधळे, सुभाष पडलवार, देवुजी पवार, अनिल जाधव, हेंत देशपांडे, प्रदीप कुडेथे, प्रदीप पवार, मनोज राठोड, प्रविण पिल्लेवार, रामदास मोरे, केंद्रप्रमुख नरवाडे, प्रा.व्ही.टी.राठोड, देविदास येरवाळ, किशोर जाधव, किशारे कावळे, पांडुरंग अकोले, दत्ता शेवाळकर, फहिम खान, योगेश वैद्य, पांडुरंग शेरे, सारंग घुले, डी.जी.क्षीरसागर, प्रा.शा.बोंढारचे मुख्याध्यापक राजाराम राठोड आदिनी अभिनंदन केले आहे.

2014-09-23_114259