“घोटाळेबाजांना शिकवणार धडा” – अविनाश राठोड

औरंगाबाद येथील वसंतराव नाईक विकास संस्थेच्या जागेचा घोळ उघड झाला आहे. यात मुख्य आरोपी प्रा. मोतीराज राठोड व सुरेश पुरी यांच्या विरुद्ध अविनाश  राठोड यांनी जिल्हा न्यायालयात 156 /3 अंतर्गत याचिका दाखल केली असून गेली काही महिन्यापासून ते लढत आहेत.
      ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी. डी. पवार यांनी प्रथमदर्शनी माहितीच्या अधिकारातून वरील संस्थेची संबंधित कागदपत्रे काढले. तर अकोला येथील अविनाश राठोड यांनी या विषयावर प्रकाशझोत टाकत कागदपत्रांच्या आधारावर वसंतराव नाईक  विकास संस्थेची जमीन रेडीरेकनरनूसार सुमारे 6 कोटी 60 लाखात वसंतदादा सुगर संस्थेला विक्री करुन मोतीराज राठोड आणि सुरेश पुरी यांनी फसवणूक केली आहे असे अविनाश राठोड यांनी सांगितले.
     या प्रकरणी अविनाश राठोड यांच्या फिर्यादीवरुन आरोपी मोतीराज राठोड व सुरेश पुरी यांच्यावर कलम 420, 406, 408, 467, 471, 34 भादवी 66 (अ) , 67 बाँबे ट्रस्ट अॅकट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
      वरीलपैकी दोन्ही आरोपीने औरंगाबाद येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता अर्ज दाखल केले होते, परंतु न्यायालयाने दोन्ही आरोपीचे जामीन मंजूर केले नाही. आज रोजी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाचे वकील रवींद्र बी. आडे हे केस लढत आहेत. अशी माहिती अविनाश राठोड यांनी दिली आहे.

-रवि चव्हाण
(युवा पत्रकार)