अजिंठा चित्रपटामुळे बंजारा समाज पुन्हा एकदा चचेर्त आलाय. एकेकाळी बैलाच्या पाठीवर माल लादूनव्यापारासाठी मुलुखभर भटणारा हा समाज आता स्थिरावतोय. काळाची गती ओळखून या समाजानेही व्यवसाय,वेश, विचारसरणी आणि सत्ताकारण या सर्वच बाबतीत परिवर्तनाच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे…………… गुरेढोरे पाळणेहा बंजारा जमातीचा प्राचीन व्यवसाय. त्यानंतर हा समाज बैलाच्या पाठीवर माल लादून वाहतूक-व्यापार करू लागला. सिंधू संस्कृतीपासून ते इंग्रजांचे देशात आगमन होईपर्यंतच्या काळात जवळपास पाच हजार वर्षांपासून सुरू असलेला हा व्यवसाय रेल्वे आल्यानंतर अचानक बंद पडला. रेल्वेच्या आगमनापायी बंजारांच्या पारंपरिक व्यवसायावर गदा आल्याने संत सेवालाल महाराज यांनी इंग्रजांनी देशात आणलेली रेल्वे जमिनीवरूननाही, तर गोर बंजारांच्या पोटावरूनच जात आहे, असे सांगतत्यांनी एक प्रकारे इंग्रजाविरुद्ध बंडच पुकारले. इंग्रजाला महसूल देऊ नका, त्यांना विरोध करा, हे त्यांचे क्रांतिकारी आवाहन समाजात रुजले. इंग्रजांनी संत सेवालाल महाराजांना समजूननघेता पुढे संपूर्ण बंजारा जातीला जन्मजात गुन्हेगार ठरवून त्यांना एक प्रकारे गुलामच केले. स्वातंत्र्यानंतर बंजारा शेतकरी मोठ्या प्रमाणात शेजमजूर बनला. आज एकही व्यवसाय-धंदा असा नाही की, त्यात बंजारा नाही. पानपट्टी आणि भाजीपाल्यापासूनते डॉक्टर, इंजिनीअर, वकील,प्राध्यापक, ठेकेदार बिल्डर्सपर्यंत सर्व व्यवसाय या जमातीने स्वीकारले आहत. स्थलांतर १९७२च्या दुष्काळानंतर बंजारांमध्ये तांडा सोडून जाण्याची प्रवृत्ती वाढली. उदरनिर्वाहाच्यासाधनांसाठी मोठ्या प्रमाणात तांड्यांवरून त्यांनी स्थलांतर केले. चार महिने ऊस तोडणी कामगार म्हणून काम करून तो तांड्यात येत असे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शहराकडे चला’ या विचारांनी मिळेल ते काम करून बंजारा शहरवासी झाले. शहरी जीवनात आल्यामुळे बंजारा जीवनात मोठे परिवर्तन झाले. ‘मी भला नि माझा तांडा भला’ हा एकलकोंडीपणा स्थलांतरामुळे हळूहळू संपत चालला आहे. तरीबहुतेकांनी तांड्याशी असलेली नाळ पूर्णपणे तोडलेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे १९५०पर्यंत बहुतेक तांडे म्हणजे गवताचीच घरे होती. स्थलांतर संस्कृतीमुळे कित्येक तांड्याचे रुपांतर भिंत आणि पत्र्याचे घरात आणि त्यापुढे सिमेंट-काँक्रिटच्या घरात झाले. मात्र तरीही आजही तांड्याला कोणी गाव म्हणत नाही. गावामुळे तांडा हेच गावाचे नाव राहिले. मात्र, १९८० नंतरयात काहीसा बदल होऊ लागला. कित्येक तांड्याची स्वतंत्र ग्रामपंचायती करून घेतल्या. वसंतनगर, नाईकनगर, सेवाभायानगर अशी नावे तांड्याला दिलेली दिसतात. स्थलांतर आणि बाहेरच्या जगाशी वाढलेल्या संपर्कामुळे असा बदल तांड्यांमध्ये दिसून येत आहे. वेशांतर बंजारा स्त्री वेशभूषा म्हणजे त्याच्या जातीची स्पष्ट ओळख. सिंधू संस्कृतीपासून ही वेशभूषा बंजारा स्त्रिने जतन करून ठेवली आहे. एके काळी, म्हणजे साधारण १९२५-३०च्या आसपास बळीराम पाटील, रामसिंग भानावत, फुलसिंग नाईक, मुंडे गुरुजी, बाबुसिंग राठोड, हिरा सदा पवार यांनी समाज सुधारणा म्हणून स्त्री वेशभूषा परिवर्तन चळवळ सुरू केली. त्याला तांड्यांत मोठा विरोध झाला. कारण वेशभूषा परिवर्तन ही पुण्यातील केशवपनसारखी क्रांतिकारी सुधारणा होती. त्याकाळी वेशभूषेतील बदलाला परिवर्तनाच्या चळवळीचे माध्यम मानले गेले असले, तरी याच नेत्यांचे अनुयायी आज मात्र राजकारणासाठी पुन्हा बंजारा स्त्री वेशभूषा उपयोगात आणत आहेत. इंदिरा गांधींपासून तेसोनिया गांधींपर्यंत बंजारांची ओळख ठसवणे म्हणजेबंजारा स्त्रीच्या वेशभूषेचे प्रदर्शन करणे एवढेचझाले आहे. १९५० ते १९८० च्या काळात फिल्मजगतात बंजारा स्त्री वेशभूषा लोकप्रिय झाली. परिणामी, आज शिकल्या सवरलेल्या घरांतील मुली-स्त्रिया फॅशन म्हणून किंवा परंपरा म्हणून ही पारंपरिक वेशभूषा परिधान करीत आहेत. काळ कसा सूड उगवेल ते सांगता येत नाही! पण काळासोबत बदलण्याचा लचचिकपणा बंजारा समाजात दिसून येतो. विचारांतर माणूस विचार करणारा प्राणी आहे. बदलता काळ, परिस्थिती याप्रमाणे आपल्यापारंपरिक विचारात त्याने बदल केला पाहिजे. आजच्या ज्ञान-विज्ञानाच्या युगात रामायण, महाभारत, पौराणिक, धामिर्कविचाराचामनावरील पगडा कमी होत आहे. विवेकबुद्धीने विचार करण्याची भूमिका वाढीस लागत आहे. साहजिकच अंधश्रद्धांचा पगडाही हळुहळू कमी होत आहे.संत सेवालाल महाराजांकडे आतापर्यंत बंजारा समाज संत, साधू म्हणूनच पाहत होता. पण सेवाभायाचे विचार क्रांतिकारक आहेत. इतकेच नाही, तर त्यांच्याविचारांनी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी स्वीकारली आहे. बाबासाहेबांनी दलित समाजाला धनदौलत, इस्टेट दिली नाही, तरस्वाभिमानाने जगण्याचा विचार दिला. त्या विचारांनी बंजारा समाज जागा झाला आहे, या विचारांतरामुळे मानवी हक्क, मानवी जीवनाबद्दल बोलू लागला आहे. भारत देश माझा आहे, तर या देशातील सत्ता-संपत्तीत माझा वाटा कुठे आहे, असा सवाल तो आज करू लागला आहे.लिहू लागला आहे, वाचू लागला आहे. चर्चाकरू लागला आहे. आता सत्तांतर लोकशाहीमध्येसत्ता किंवा सत्तेमध्ये सहभाग महत्त्वाचाअसतो.वसंतराव नाईक सत्तेत असल्यामुळे त्यांनी बंजारा समाजाला मान, प्रतिष्ठा मिळवून दिली. सत्तेशिवाय शहाणपण नाही. वसंतराव नाईकांनी बंजारा समाजाला सत्तेचीवाट दाखविली. जवळपास २३ वर्षे ते राजकारणात होते. त्यामुळे महाराष्ट्रातीलबंजारा वसंतराव नाईकांना आपले दैवत मानतो.बंजारा समाज हा वसंतराव नाईक आणि काँग्रेसपक्षाशीएकनिष्ठ राहिला आहे. मतदान करणे म्हणजे काँग्रेसला ही मानसिकता बंजारा समाजाची होती. या एकनिष्ठतेचा फायदा काँग्रेसने घेतला आणि एक प्रकारे बंजारा समाजाला मत-कैदीच बनविले. वसंतराव नाईक यांनी भटक्या-विमुक्तांकरिता विशेष सवलती जाहीर केल्या होत्या. शरद पवार यांनीही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिदीर्त बंजारांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या होत्या. वसंतराव नाईक विकास महामंडळातफेर् आथिर्क तरतूद, स्वतंत्र गृहनिर्माण योजना, शिक्षणासाठी आश्रमशाळा, वसतिगृहे, शिष्यवृत्ती, जमीनवाटप आदी योजनांचा यामध्ये समावेश होता. मात्र त्यापुढच्या पाटील-देशमुख मानसिकतेच्या सरकारांनी या हळुहळू बंद केल्या. त्यासाठी बजेटनाही, निधी नाही, अशीकारणे त्यासाठी दिली गेली. इतकेच नाही, तर भटक्या-विमुक्तांच्या सूचीमध्ये राजकीय उद्देशाने भारंभारजमातींचा समावेश करून खऱ्या गरजूंवर अन्यायच केला. वास्तविक, महाराष्ट्र राज्याच्या यादीत बंजारा जमातभटक्या-विमुक्तांमध्ये (एनटी) आहे. तर केंद सरकारच्या यादीत या समाजाला ओबीसींमध्ये ठेवण्यात आले आहे. अन्य राज्यांमध्येही हा समाज अनुसूचित जाती वा अनुसूचित जमातींमध्ये आहे. महाराष्ट्रातील बंजारा समाजाला केंदाच्या अखत्यारीतही अनुसूचित जाती-जमातीप्रमाणे सवलती मिळाल्या पाहिजेत, अशी या समाजाची एकमुखी मागणी आहे.मात्र ते दूरच राहिले आहे. ओबीसी ठरवल्याने क्रीमी लेटरची अट घालण्यात आली आहे. अलिकडे यांची पदोन्नतीही रोखण्यात आली आहे. एकप्रकारे बंजारा समाजाचा सूड घेण्याचेच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे धोरण आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात बंजारा जमातच नाही. त्यामुळे मतदार नसल्याने त्यांची दखलही घेतली जात नाही. ऐतिहासिक निर्णय काँग्रेसपक्षाचीगुलामी नाकारून ३१ ऑगस्ट २००७ रोजी विमुक्त दिनी जवळपास ४२ जातींतील पाच हजारकार्यर्कत्यांनी बहुजन समाज पाटीर्त प्रवेश केला. त्यामध्ये बंजारा मोठ्या प्रमाणात सहभागी झाला. आता आदिवासी भटके-विमुक्त बंजारा समाज सत्तेत सहभागी होण्यासाठी पूर्ण तयार आहे. महाराष्ट्रात जवळपास सत्तर लाख बंजारा समाज आहे. राज्यातील २८ मतदारसंघांत त्यांचे तीस टक्के मतदार आहे तर, १० मतदारसंघात २० टक्के मतदार आहेत. त्यामुळेबंजारा समाजाची दखल घेणे सत्ताधाऱ्यांनाही भाग पडणार आहे. ( लेखक ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते आहेत.