रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही
ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच,
आपले जीवनही पुसले जाणार आहे
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..
प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची
‘एकमेव अप्रतीम कलाकृती’ असतो..
कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!
स्वच्छ पाण्याचा जसा तळ दिसत असला ना की,
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या बाबतीत असतं
त्याच्या मनाचा तळ समजला की,
त्याच्या सहवासाची भीती वाटत
नाही…आणि नातही स्वच्छ वाटू लागतं…….
|| शुभ दिवस ||
तुमचा दिवस आनंदात जावो.
आणि मन प्रसन्न राहो.
सौजन्य:- गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,तथा संस्थापक/अध्यक्ष,
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था ठाणे, महाराष्ट्र राज्य,