डिजीटल इंडियामध्ये तांडा अजूनही हरवतोय..!
“सोशल अॉडीट होणे आता गरजेचे”. :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
:-आज प्रत्येक घटकाच्या अवस्थेला बुलेटट्रेनची जोड लाभत असताना,आमच्या न्यायवंचित तांड्याच्या अवस्थेला किमान ‘शंकुतला आगगाडी’चीही वेग लाभू नये,हि शोकांतिका नव्हे तर सपशेल पराभवच मानावे लागेल.समाजातल्या क्रिम म्हटल्या जाणार्याचं अन् व्यवस्थेंच देखिल..!
राज्यात लोकप्रिय होत असलेल्या ‘तांडेसामू चालो’ या लोकोत्तर आणि दूरगामी संकल्पनेच्या अनुषंगाने तांड्याचे संपुर्ण जीवन जेंव्हा अवलोकनास पुढे येत आहे.तेव्हा खरचं वाटते की, ‘डिजीटल इंडियामध्ये तांडा हरवतोय..!’ या जगाला वैश्विक आणि अभिजात तत्वज्ञानाचा सामर्थ्य जोपासत आलेल्या तांड्याचे जर आज भयावह चित्र असेल तर किती मोठा पराभव म्हणावे लागेल. तांड्याला मानवी हक्क व मानवी गरजाच्या अभावश्रृंखलेतून मुक्त करण्याची आज खरी गरज आहे.त्यावर चिंतन आणि कृतीकार्यक्रमाची. परंतु आज विरोधाला विरोध म्हणून अन् फक्त धर्मांधतेच्या चौकटीत गुरफटून ‘कृतीपेक्षा बाता’ ठोकण्यातच ऊर्जा जात असेल तर महानायक वसंतराव नाईकाचे व्हिजन पुर्णत्वास येणार नाही. तांड्याला आज आधुनिकतेची कास अवलंबवीणे गरजेचे आहे.तांडा संविधानाच्या कलमाने साक्षर होणे गरजेचे आहे.वसंतविचारधारा च्या मतीस्पर्शाने तांडा तेजोमय होणे गरजेचे आहे.हा अभिजात आणि अपूर्व गोरध्यास घेऊन ‘तांडेसामू चालो’ ही संकल्पना जनमाणसात आज रुजत आहे,हि कौतुकाची बाब मानावी लागेल. समाजातील सर्वच संघटना,किंवा सर्वच विचारवंत,दिशादर्शक व्यक्ति समाजविघातक आहे,असे नकारात्मक प्रचार करणे चुकिचे आहे. प्रत्येकाने आपली ‘सोशल रिसपॉंसिबिलीटी’ अवलोकन करुन न्यायवंचितासाठी विधायक कृती करणे हे समाजाच्या उज्वलतेसाठी हितकारक ठरणारे असते.
‘पे बैक टू सोसायटी’ ची बीजे पेरणे गरजेचे बनले आहे.त्यासाठी वैचारिक समृद्धिही तेवढीच महत्वाची आहे. एका घडीला पैशानी सालदार झालीत तरी चालेल,परंतु विचाराने सावकार होण्याची खरी गरज आहे,विचाराने सावकार होणारी कधी सालदार बनुच शकत नाही.
आता तांड्यातल्या प्रत्येक न्यायवंचितापर्यंत सन्मानाचे,मानवी हक्काचे उत्थानकिरणे आपण पोहचवुया.स्वत:च स्वत:चा सोशल अॉडिट करुन समाजाच्या समृद्धिसाठी एकदिलाने सकारात्मकतेनी पुढे येऊया. डिजीटल इंडियामधला न्यायवंचित असलेला आजचा आमचा तांडा हा उद्याचा ‘ग्लोबल तांडा’ म्हणुन साकारण्यासाठी संकल्प करुया. ✒ एकनाथ पवार,
‘तांडेसामू चालो अभियान’..
ध्यास समग्र पुनर्रुत्थानाचा..!
ग्लोबल तांड्याचा..!!!
दि.३१ मार्च २०१७ ,नागपूर .
सौजन्य:- गोर कैलास डी राठोड
गोर बंजारा न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य
Tag: Banjara Live National News, Indian Banjara News, Lamani, Lambadi