नांदेड (प्रतिनिधी) : डॉ. मोहन चव्हाण यांना दि. 21-12-2014 रोजी महात्मा कबीर समता परिषद तर्फे महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सर्वात कमी वयात यांना मिळाला व या अगोदर राष्ट्रीय पातळीचे राष्ट्रीय वसंतभूषण पुरस्कार व नांदेडरत्न पुरस्कार मिळाले. डॉ. मोहन चव्हाण हे समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला. आजपर्यंत त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये वेळोवेळी समाजाच्या उपयोगास येणारे उपक्रम राबविले आहेत. तसेच त्यांनी व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, समाजाचे प्रतिनिधीत्व अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेवून महात्मा कबीर समता परिषदेतर्फे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बी.यु. गोसावी दिल्ली, मधुकर बोरकर नागपूर, मुकूंद पाटील व इतर प्रतिष्ठीत मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. मोहन चव्हाण यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आजपर्यंत बंजारा समाजातून पहिले व्यक्ती ठरले आहेत. चिदगीरी येथे वसंतराव नाईक शैक्षणिक संस्था काढून गोर गरीब विद्याथ्यार्सांसाठी मुळगावी चिदगीरी येथे वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय सुरु केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे.