डॉ. संयोगिता नाईक वाचनालयाचे उद्घाटन -151 तांडय़ामध्ये वाचनालय अभियान-डॉ. गणपत राठोड

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : वसंतराव नाईक युवा संघटनेच्या वतीने 1 फेब्रुवारी 2015 रोजी परसुबा तांडा ता. धारुर जि. बीड येथे डॉ. संयोगिता नाईक वाचनालयाचे उद्घाटन उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. वसंतराव नाईक युवा संघटनेच्या अध्यक्षा व 151 वाचनालय तांडा-तांडय़ामध्ये उघडण्याचा निर्धार करणार्या, वाचनालय प्रवर्तक डॉ. संयोगिता नाईक यांचेच नाव देण्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्यांच्या एकमताने ठरले. डॉ. संयोगिता नाईक वाचनालय, परसुबा उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ. संयोगिता नाईक पुणे ह्या उपस्थित होत्या. 2015-02-18_113011अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. दिलीप चव्हाण, प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. सुनंदा टाक, अनंत गीते, वसंत राठोड, प्रा. एस.पी. कुलकर्णी, सौ. रत्नानाईक आदि मान्यवर उपस्थित होते. ग्रंथालयाचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर सर्व पाहुण्यांचे सत्कार संयोजक व सचिव वसंतराव नाईक युवा संघटना डॉ. गणपत राठोड तसेच स्वागताध्यक्ष तुकाराम पवार यांनी केले. तांडय़ा-तांडय़ामध्ये अजूनही समस्या भयंकर आहेत. वाचनाची सोय नाही, समाजामध्ये अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, असंघटन, अविचार, अशिक्षीत व बालविवाह, हुंडापद्धती इत्यादी समस्या तांडय़ामध्ये भेडसावत आहेत.

वाचनालय निर्मितीमुळे तांडय़ातील नागरीक, युवक दैनिक पेपर, ज्ञान देणारी पुस्तके वाचतील आणि नवीन पीढीला एक नवी दिशा मिळेल. या व्यापक उद्देशाकरिता माजी आमदार बाबुसिंग राठोड फाऊंडेशन चालीसगाव व वसंतराव नाईक युवा संघटनेनी महाराष्ट्रातील 151 तांडय़ामध्ये ग्रंथालय उघघडण्याचा संकल्प केल्याप्रमाणे पिंपरखेड तांडा (चाळीसगाव) व परसुबा तांडा (ता. धारुर) येथे ग्रंथालयाचे उद्घाटन संपन्न करुन यशस्वीपणे अभियानास प्रारंभ झालेला आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांनीआपले मनोगत व्यक्त केले. डॉ. संयोगिता नाईक वाचनालय, परसुबा येथे उद्घाटन समारंभ यशस्वी करण्यासाठी ऍड. प्रकाश राठोड, देविदास पवार, प्रा. सुनिल राठोड, पवन चव्हाण, लिंबा पवार, ग्रंथालय सुभाष पवार, हरिभाऊ पवार, अर्जुन पवार, विजय पवार, प्रा. राजकुमार कांबळे यांनी परिश्रम घेतले. सौ. सिंधु राठोड, सौ. वैशाली राठोड, सौ. सुशिला राठोड व तांडय़ातील त्री-पुरुष व आसपासचे नागरीक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. एस.आर.टी. कॉलेजचे ग्रंथपाल गादेकर, संजय देशमुख हे ही उपस्थित होते. शेवटी संयोजक डॉ. गणपत राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.