तळेगांव तांडा,ता,चाळीसगांव येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स शाखा फलक व बंजारा समाज मेळावा संपन्न

चाळीसगांव :- दि.७’अॉक्टो.रोजी ‘चाळीसगांव शहर व तळेगांव तांडा’ येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने शाखा फलक अनावरण व बंजारा समाज मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्माराभाऊ जाधव आणि प्रदेशाध्यक्ष-अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते झाले.तर,प्रमुख अतिथी-मा.वाल्मीकभाऊ पवार(राष्ट्रीय महासचिव),मा.अनिलभाऊ पवार(राष्ट्रीय सरचिटणीस),मा.मुरलीभाऊ चव्हाण(राष्ट्रीय संघटक),मा.ॲड.अविनाशजी जाधव(राष्ट्रीय प्रवक्ता),मा.राजेशजी नाईक(राष्ट्रीय कोषाध्यक्ष),मा.विष्णूभाऊ राठोड(राज्य कार्यकारीणी सदस्य),मा.राजु राठोड(नाशिक जिल्हाध्यक्ष),मा.भरत पवार(जि.सचिव-जळगांव),मा.गोकुळ राठोड(आंबिवली शहराध्यक्ष),मा.सतिष राठोड (पत्रकार),मा.सरीचंदभाऊ चव्हाण (तालुकाध्यक्ष-चाळीसगांव),मा.गोवर्धन राठोड(मा.उपसरपंच),इ.मान्यवर उपस्थित होते.यावेळी मा.आत्मारामभाऊ जाधव यांनी मेळाव्यातील समाजबांधवांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,समाजातील अनिष्ट(अंधश्रद्धा) रुढी-परंपरा,बंद व्हायला पाहीजे,तरुणांनी व्यसनमुक्तिची शपथ घेऊन समाजामध्ये आदर्श निर्माण केला पाहीजे,तांड्यांमधील अवैध धंदे-दारु,पत्ता,सट्टा,इ,व्यवसाय बंद करुन समाजाचे आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज,प.पु.लक्ष्मणचैतन्यजी बापूजी, हरितक्रांतीचे जनक,बंजारा रत्न-कै.वसंतरावजी नाईक, यांच्या विचारांवर चालले पाहीजे.येणाऱ्या कालावधीमधे संघटनेतर्फे असेच विविध प्रकारचे सामाजिक विषयांवर आधारीत जनजागृती मेळावे तसेच विविध कार्यक्रम समाजातील विविध घटकांमधे/परिसरामधे आयोजित करण्यात येतील व समाजाला अजुन चांगल्या प्रमाणामधे संघटीत होण्यासाठी आवाहन करण्यात येईल.संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार आणि प्रदेशाध्यक्ष-अशोकराव चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी संघटनेतर्फे चाळीसगांव शहर व तळेगांव तांडा शाखा पदाधिकारी यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे चाळीसगांव’ शहराध्यक्ष-विष्णू राठोड,उपाध्यक्ष-आकाश जाधव,सचिव-अनिल राठोड,दिलीप राठोड(सहसचिव),योगेश राठोड(सरचिटणीस),राजमल राठोड(संघटक),तसेच तळेगांव तांडा अध्यक्ष-सुनिल राठोड,उपाध्यक्ष-अरविंद चव्हाण,सचिव-समाधान चव्हाण,सहसचिव-कैलास राठोड,सरचिटणीस-प्रेमसिंग राठोड,संघटक-लहू पवार,सहसंघटक-दिलीप जाधव,कोषाध्यक्ष-विठ्ठल चव्हाण,सदस्य-निलेश राठोड,अरुण चव्हाण,लक्ष्मण चव्हाण,ईश्वर चव्हाण,श्रीराम राठोड,योगेश चव्हाण,सल्लागर-सचिन चव्हाण,मयुर चव्हाण,अर्जुन राठोड,इ.पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.