तांडा म्हणजे बंजारा लोकांचा समुदाय होय.व्यवसायाचा निमित्ताने भटकणाऱ्या बंजारा समुदायाला तांडा असे म्हणतात. अलीकडील काळात या समाजाचे भटकने बंद झाले तेव्हा बंजारे जेथे वास्तव्य करतात त्या ठिकाणाला आता तांडा असे म्हटले जाते. या तांडयाचे वैशिष्टे म्हणजे यात फक्त बंजारा समाजातील लोक वास्तव्यास असतात. इतर समाजातील लोकांना तांडयात स्थान नसते. तसेच हे तांडे गावापासुन दुर डोंगरदऱ्यात आढळुन येतात. सर्व्हेअंती असे सिध्द होते की, पाण्याची मुबलक सोय, गुराढोरांना चरण्यासाठी मोकळे मैदान पाहुनच तांडे वसलेले दिसुन येतात. या तांडयाची व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी तांडयाची एक स्वतंत्र प्रशासन व्यवस्था असते.
बंजारा समाज मागासलेल्या अवस्थेत असताना त्यांच्या टोळयांना निसर्ग व हिंस्त्र पशूंसोबत सतत सामना करावा लागत असे. आलेल्या संकटांना तोंड देणे हे सामुदायिक प्रयत्नांशिवाय शक्य नव्हते. याच धारणेतून बंजारात लोकगणात समूह भावना जोपासली गेली. पावसाळयात बंजारा समाज आपआपल्या झोपडया बांधून राहात होता. त्याला “झुपडी” असे म्हणतात. ही “झुपडी” पावसाळयापुरतीच मर्यादित राहत होती. पुढे बहुर्विवाही गोत्रांचा गटसमूह “तांडा” या नावाने ओळखला जाऊ लागला व तांडयाची देखरेख करण्यासाठी “गोरपंचायत” प्रशासनाची पध्दत तांडयात रुढ झाली. ही गोरपंचायत तीनस्तरीय असते.
१) नसाबीः- न्यायदान करणारी समिती
२) हासाबीः- आर्थिक उपाययोजना करणारी समिती
३) मळावः- दोन किंवा त्यांपेक्षा अधिक तांडयांतील पेचप्रसंग सोडविण्यासाठी बोलावलेली सभा (मेळावा)
भास्कर राठोड सवयम सेवक गोर बंजारा संघर्ष समिती तथा भा.ब.क.से.संस्था संघटन सचिव ठाणे जिल्हा