“तांडा सबलीकरणाचा लोकोत्तर ध्यास”:- तांडे सामू चालो अभियान!

article gor-banjara-news-logo


:तांडेसामू चालो अभियान.

बंजारा लोकजीवनाचा चिरंतन प्रारुप म्हणजे तांडा. तो आजच्या डिजीटलायजेशन मध्ये आजही उभा आहे.मुठित जीव धरुन.. संस्कृतीचा हा  प्रारुपच आज भयाण विवंचनेत पायबंद झालेला दिसत असताना,त्याच्या  सबलीकरणासाठी आता परिणामकारक आणि सकारात्मक संवादकृतीची सेवाकृतीची नितांत गरज आहे.एसी कुलर मध्ये राहुन बंदखोलीत समाजावर आणि समाजासाठी विधायक कार्य करणार्या विषयी *तथ्थहिन भाष्य करण्यापेक्षा  ४२:४३ डिग्री सेल्सियस तापमानातही प्रत्यक्ष तांड्याशी  संवाद साधणारा तांड्याच्या सबलीकरणाचा लोकोत्तर ध्यास म्हणजे तांडेसामू चालो अभियान म्हणता येईल.* प्राचीन संस्कृती कितीही वैभवशाली असेल, परंतु ते वैभव संवर्धित करण्याची प्रगल्भता आणि सृजनताच जर  गतीशुन्य आणि नकारात्मक होत असेल, तर तांडा परिवर्तनाच्या दिशेने आगेकूच कसा करणार..?   त्यासाठी वैचारिक समृद्धतेची पायाभरणी भक्कमपणे करणे गरजेचे आहे ,त्याचबरोबर संविधानाच्या कलमाने साक्षर करणेही तीतकेच गरजेचे आहे. *महानायकाचा व्हिजन शेवटच्या घटकापर्यंत देखिल पोहचवीणे आवश्यक झाले आहे.* नकारात्मकता फेकुन  सकारात्मक सेवाकृतीचा ,नव्या विचाराचा पर्व आता सुरु झालेला आहे.                                  

 *आयी भायार लोर रे…                                      

नगारारो घोर.                                  

नगारारे घोरे मायी…                                        

लदण जाये गोर…                              

जना पकडा जाये चोर…                    

इजारेरी इजारदारी चली जाय,                                                                                    

खुटीर जुपना खुटीम टकजाय..                  

मार गोरमाटी केसुला नायी मोरजाय..!          

तांडेसामू चालो अभियान                        

– ध्यास समग्र पुनर्रुत्थानाचा..!                

ग्लोबल तांड्याचा..!!!

नागपूर पासून ६०:६५ किमी अंतरावर असलेल्या पुसागोंदी तांड्याशी संवाद साधण्यात आला. रामदेवबाबा सभागृहात आयोजित कृतीकार्यक्रमाला उमाजी नायक,दैनिक सकालचे सह संपादक प्रमोदजी कालबांडे,अभियानाचे प्रवर्तक एकनाथ पवार,सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव,जिल्हा संपर्कप्रमुख बंडुभाऊ राठोड,तांडादूत रमेश चव्हाण,हरिश राठोड  यांची प्रमुख उपस्थिती होती. तांड्याच्या व्यथा प्रश्न अपेक्षा ग्रा.पं सदस्य तसेच नायक व तरूणानी मांडल्या. नंतर तांड्याच्या पायाभूत प्रश्नासंदर्भात पाहणी करण्यात आली. तांडा सबलीकरणाचा हा ध्यास बघुन ग्रामस्थानी कमालीचा आनंद व्यक्त केला. 

श्री.एकनाथ पवार नागपुर

सौजन्य: गोर बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य.

 

Tag: Banjar Article, History, Gor Banjara News, Banjara Live. Banjara Handicrafts