तांडेसामू चालो अभियान’ध्यास समग्र पुनर्रूत्थानाचा ग्लोबल तांड्याचा”


 “तांडेसामू चालो अभियान”                               ध्यास समग्र पुनर्रुत्थानाचा..!        ग्लोबल तांड्याचा..!!                          :::::::::::::::::::::::::::::::::::::::::      न्यायवंचिताच्या समग्र पुनर्रुत्थानाचा राज्यातला “तांडेसामू चालो” हा पहिलाच अभिनव असा लोकोत्तर अभियान.! निस्पक्षतेनी आणि सामाजिक बांधिलकीच्या निर्व्याज सेवाभावी हेतूने मानवमूक्तिचा नवा क्षितिज कवेत घेऊन ही संकल्पना अभिजात पब्लिक मुव्हमेंटचा वलय साकारत आहे.        राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी “खेड्याकडे चला” ही प्रगल्भ संकल्पना पहिल्यांदा देशापुढे मांडली.त्याची गरज आजही आहे आणि भविष्यातही. परंतु एकेकाली वैभवशाली संस्कृति असणार्या गोरसंस्कृतीचा तांडा- बंजाराचा तांडा हा प्रवाहाबाहेरच लोटत गेला,आजच्या डिजिटल इंडियाच्या युगातही तसेच भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन गेली कित्येक दशके लोटली,तरीदेखिल तांडा प्रवाहबाहेरचे जीवन जगतोय.या मूकवेदनेमधून आणि समाजाच्या  अस्तित्व झूंजमधून या सामाजिक बांधिलकीचा जन्म झाला..महानायक वसंतराव नाईक साहेबाचे अद्वितीय ऋणानुबंध इथल्या जीवा-जीवावर आहे.राज्याला सुजलाम सुफलाम करीत असताना विविध लोककल्याणकारी धोरणे आणि पंचायतराज द्वारे वंचिताच्या सबलीकरणाचा त्यांचा ध्यास हे देशाच्या उभारणीसाठी बहुमोल ठरणारे होते.हि महानायकाची सर्वव्यापी लोकहिताची विचारशिदोरी आणि ऐतिहासिक गोरसंस्कृतीची पिठागौर पासून रुजत आलेली विश्वव्यापी “सेनं सायी हेस” हे मुलतत्वे तसेच मानवमूक्तिची ओढ ह्रद्यात जपून वैचारिक सिद्धांताला सेवाकृतीची समृद्ध जोड दिल्या जात आहे.ही बाब कौतुकास्पद तेवढीच प्रेरक म्हणावी लागेल.न्यायवंचिताची वेदना,त्यांचे पायाभूत प्रश्न,त्यांची न्याय्य अपेक्षा,रोजचा जीवनसंघर्ष,समुपदेशना अभावी दिशाहीन होत जाणारी यूवापिढी यासर्व बाबी प्रत्यक्षात जाणून घेणे.शिवाय तांडामधून मेट्रोसिटीत गेलेल्यांचा अनुबंध पून्हा जन्माच्या गाठेशी बांधून Pay back to society म्हणून सामाजीक ऋणानुबंधाची जाणिव विकसित करणे.तांड्याला आधुनिक प्रवाहाशी जोडुन तांडा स्वाभिमानाने आपला अस्तित्व या व्यवस्थेमध्ये अधोरेखित करावा,संविधानाच्या कलमाने साक्षर व्हावा,वसंतविचारधारा तांड्यापासूनच पुढे यावी.अशा दृढसंकल्पातून “तांडेसामू चालो अभियान” न्यायवंचित तांडा वाडीपर्यंत सर्वाच्या सहयोगाने दूरवर पोहचतो आहे.ग्रासरुटवरील अनेक निस्पक्ष व सेवाभावी असणारे न्यायवंचिताचे हितचिंतक आणि “तांडादूत” खर्याअर्थाने या लोकोत्तर अभियानाचे शिलेदार म्हणावे लागेल.सामाजिक बांधिलकीचा वसा जपणार्या लोकप्रिय वृत्तपत्र दैनिक सकाल च्या सहयोगाने या अभियानाला गतीशिलतेची नवी पहाटच आल्यासारखी झाली.  या संकल्पनेचे हेच तर प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तांड्याच्या उत्थानासाठी फक्त एखाद्या समाजधुरिण व्यक्तीमत्वाने जावे,संवाद साधावे,यापुरती मर्यादित ही संकल्पना नसून समाजातील स्वावलंबी घटकासह शासन यंत्रणा,लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यम यासर्व घटकानी तांड्याची प्रत्यक्ष दखल घ्यावी.हे अपेक्षित आहे.न्यायवंचितासाठी संजीवन ठरत असलेल्या “तांडेसामू चालो” ही लोकोत्तर संकल्पना न्यायवंचितासाठी समर्पीत सेवाभावानी झटणारे प्रसिद्ध साहित्यिक, एकनाथ पवार यांची संकल्पना होय. तांड्यापासून आज दिवसागणिक सर्वांचा संवाद दूरावत चालला आहे,जेवढा संवाद दूरावेल तेवढाच तांडा आणि तांड्यातला शेवटचा घटक न्यायवंचीत राहिल.त्यासाठी न्यायवंचिताना जोडणारी ही अभिजात संकल्पना भविष्यातही महत्वपूर्ण ठरणारी आहे.उपराजधानी नागपूरमधिल एका दूर्गम भागातील माहुरखोरा या तांड्यापासून या लोकोत्तर अभियानाची पायाभरणी दि.14 सप्टेंबर2016 रोजी सर्व मान्यवरासह तांड्यातील नायक कारभारी डायेसांण,लोकप्रतिनिधी या  सर्वाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पायाभरणी झाली. आपणच आपल्या न्यायवंचिताच्या जीवनात उत्कर्षाची,सन्मानाची आणि परिवर्तनाची नवज्योत पेटवूया.चिरंतन चालणार्या या लोकोत्तर संकल्पनेचा, या लोक अभियानाचा एक ऐतिहासिक साक्षिदार होऊया.चलो दीप जलाए,जहॉं अभी भी अंधेरा है।                  :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::चला तर…या लोकोत्तर अभियानात निस्पक्षतेनी सहभागी होऊया,आणि न्यायवंचित तांड्याचा पुनर्रुत्थान घडवून आणुया,  अभियान आपल्याही तांड्यात येणार,…. 

संपर्क जरूर  साधा. 

📞9850131368    

श्री एकनाथ पवार नागपुर,                  

तांडेसामू  चालो अभियान

  ध्यास समग्र पुनर्रूत्थानाचा.! ग्लोबल तांड्याचा..!! 

————-जय गोर————

सौजन्य:- गोर कैलास डी राठोड

गोर बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य.

Website: m.banjaraone.com

सम्पर्क 9819973477/8652822469