“तांड्याचा साहित्यकार: आत्माराम कनिराम राठोड”

“तांड्याचा साहित्यकार: स्व.आत्माराम कनिराम राठोड”

‘तांडा’कार :आत्माराम राठोड उपाख्य डैनियल राणा यांची आज जयंती.
त्यानिमित्त विशेष.
अवश्य शेअर करा.

मानवमुक्ती लढ्यातला पुरोगामी साहित्यिक : आत्माराम राठोड

”पंच पंचायत राजा भोजेर सभा” असे नमनविधान म्हणून, आपल्या न्यायप्रीय महान राजा भोजचा स्मरण करून आपल्या गोरपंचायतीला अन् शुभकार्याला प्रारंभ करणारा हा क्षत्रिय कुलभूषण गोरबंजारा समाज. स्वतंत्र अस्तित्ववादी व समतावादी परंतु अंधारमय तांडावस्तीत एक नवा साहीत्यातला शब्दतेज १३ जानेवारी १९४८ रोजी ‘तांडा’कार आत्माराम राठोडाच्या रूपाने उद्यास आला. मोहाईजारा ता.पूसद ही त्यांची जन्मभूमी.
          तांडाकार एक प्रतिभावंत साहित्यिक होते.प्रगल्भ आशय,उपेक्षिताची वेदना आणि मानवमूक्तीचा आशावाद त्यांच्या लेखणित असायचा.धुर्त व्यवस्थेनी नाकारल्याची वेदना अभिव्यक्त करून एक निर्वाणीचा इशारा देतात,
“यापुढची घटना आम्हीही लिहू
आमची भाषाच अजून
लिपिबद्ध व्हायची आहे.”
  यामधून या न्यायवंचित राहीलेल्या क्षात्रतेज गोर संस्कृतीचा विद्रोह मनाला हेलावून सोडतो.प्रस्थापीतानेच नव्हे तर संविधानाच्या रक्षणकर्त्यानी या समग्र न्यायवंचिताकडे दुर्लक्ष केल्याचे दु:खही यामधून दिसतो.”लदेनी” “श्री संत सेवादास लिलाचरीत्र” आदी साहीत्यकृती.श्री संत सेवादास लिलाचरीत्राला पुणे विद्यापीठाचा पुरस्कार प्रदान.’तांडा’कार आत्माराम राठोडाची साहित्यप्रतिभा समग्र साहित्यविश्वाला एक अभिजात सामर्थ्य प्रदान करणारी आहे. प्रख्यात विचारवंत व ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या शब्दात ,”दाहक सौंदर्यीकता शिल्पीत करण्याची अफाट क्षमता असणारा कवी म्हणजे आत्माराम राठोड होय.” तांडाकाराची लेखणी अत्यंत प्रगल्भ होती.प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रसिध्द चित्रपट गीतकार,’वेदना’कार एकनाथ पवार यांच्या मते,” तांडाकार म्हणजे साहित्यातले एक प्रभावी क्षेपणास्त्र होय.” आणि “तांड्याचा एक परिवर्तनवादी सैटीलाईट” या शब्दात प्रसिद्ध साहित्यीक एकनाथ पवारानी त्यांचे वर्णन केलेले आहे.
        समाजवाद आणि
मार्क्सवाद ही ओतप्रोत भरलेली आयुधे त्यांच्या लेखणीतून अन् कृतीतून समाजापुढे आली.
        “तांडा” नामक आत्मकथेने साहित्य आणि समाजात एक विलक्षण लक्ष वेधून घेतले.तांड्यातला मुकआक्रोश येथूनच जगासमोर आला.तांडाकाराची दखल आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त लेखिका महाश्वेता देवी हीने घेतली.  तांड्याला प्रकाशमान करण्यासाठी ते पेटत राहिले.ते डैनियल राणा या नवीन नावाने जगभर पोहचले.आजही चर्चमध्ये त्यांनी रचलेली कवणे म्हटल्या जाते,हे विशेष. तांडाकाराचा परिवर्तनवाद म्हणजे धर्मांतर नव्हता,तर मानवमूक्तीचा एक हुंकार होता.
       “तांडा नव्या समाज निर्मितीसाठी पेटुन उठावा,तांड्याने जूनी विषारी कात फेकुन द्यावी,तांडा परिवर्तनवादी होऊन समग्र मानवमूक्तीसाठी लढावा.” ही तांडाकार  डैनियल राणाची आंतरिक इच्छा.
प्रवाहाबाहेर असणारा तांडा आता वैचारिक क्रांती आणि समाजप्रबोधनासाठी त्यांच्या वाटेवर अनेक लेखणी आता सरसावू लागली आहे.गोर बंजारा साहित्य अन् संस्कृतीला वैभव प्रदान करू लागली आहे.वीरा राठोड औरंगाबाद,एकनाथ पवार नागपूर या सारखे प्रतिभावंत साहित्यिक समर्थपणे पुरोगामी,परिवर्तनवादी तांड्याचे अविष्कार झालेत.तांडा आता पुरोगामी वारसा जपतोय.आपल्या सन्मानासाठी ,मानवी हक्कासाठी आता तांडा पेटुन उठतो आहे.हा मानवमूक्तीचा वारसा पंजाब चव्हाण पुसद,पी. विठ्ठल,रमेश जाधव औरंगाबाद,वीरा राठोड औरंगाबाद,एकनाथ पवार नागपूर,डॉ.रूख्मीनी पवार बीड,रतन आडे,प्रभंजन चव्हाण,गणपत राठोड,अशोक पवार.प्रकाश राठोड ,मांगीलाल राठोड,विनायक पवार ,यशोदा पवार,पूनम पवार नागपूर,प्रमिला जाधव औरंगाबाद,रतनराठोड,ताराचंद चव्हाण,गणेश चव्हाण,विजय जाधव वाशीम,श्रीकांत पवार या सर्व साहित्यवंताच्या प्रगल्भ लेखणीतून गतिमान होत आहे.हीच तर तांड्याची खरी फलश्रुती म्हणावी लागेल.कारण तांडा आता “लिहिता-वाचता” झाला आहे.
तांडाकार विद्रोही साहित्य संमेलनाचे व आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.तांडाकाराची दखल महाराष्ट्राबाहेरही घेतल्या गेली,परंतु ज्या तांड्याला परिवर्तनाची बाराखडी दिली,त्याच तांड्याने दखल का घेऊ नये..?त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण साहित्यविश्व आक्रोशला. परिवर्तनवादी गोर बंजारा साहित्यातला हा अस्सल पुरोगामी प्रतिभावंत साहित्यिकाची लेखणी या पुढेही जनमाणसात अजरामर राहील.त्यांच्या ६८व्या जयंती निमित्त विनम्र गोर सलाम..!!
विनम्र आदरांजली..!!!
💐👏🏻
तर्फे..
बंजारा साहित्यकार याडीकार श्री पंजाबराव चव्हाण
पुसद जि.यवतमाळ,

सौजन्य: गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,व प्रमुख एडिटर
बंजारा आँन लाईन न्युज पोर्टल
Website: www.banjaraone.com