मी तांडा, पाल, काफीला सारं काही पाहिलं
पण कुठच विकास नाही दिसलं.
भकास वस्ती,
दारिद्रयाची ‘कश्ती’
योजनेला वस्तीची ‘ऍलर्जी’
तरीही तुम्ही ‘ऑल इज वेल’
कसे काय म्हणता…?
काळ तंत्रज्ञानाचा आहे
म्हणुन…
डोकं सुन्न होते
तांडा पाहून.
उघडय़ावरची मुले…
केजलेली फुले..
शिक्षणाची गळती..
वाढते बालकामगार..
सारं काही ओसाड-ओसाड
भारतभर फिरले ‘रेणकेजी’
तरीही तुम्ही ‘वेट अँड वॉच’
कसे काय म्हणता..?
रस्ते, वीज, आरोग्य, उदयोग
सुविधा सार्या…
तांडय़ापासून कोसो दूर आहे.
अंधश्रद्धेचा नजराणा
कर्जाचा डोंगर
उपोषणाचा कुपोषण
भटकंती, लाचारी, व्यसन
येथे सार्याचा वास आहे
‘गोरमाटी’ एक पण सूची अनेक
तरीही तुम्ही ‘कीप सायलेंस’
कसे काय म्हणता..?
‘इंडिया शायनिंग’, ‘भारत निर्माण’
तोंडही दाखवत नाही तांडय़ाला.
न्याय, स्वातंत्र्य ‘व्यक्तीची प्रतिष्ठा’
‘दर्जा व संधीची समानता’
स्वावलंबन
स्वाभिमान
अजूनही पोहचत नाही तांडय़ापर्यंत
तरीही तुम्ही ‘डॉक्रशी’
कसे काय म्हणता..?
– कवी एकनाथ पवार (वेदनाकार)
नागपुर मो. 9850131368