तोंड (लबाडांचे) भास्कर राठोडठाणे /मुंबई

मानवाचे सुखं कोणी हेरले,
कळत नकळत विष पेरले.

जातीच्या गर्दीत सुख हरवले,
दुखनं एकच, बाजार मांडले.

व्यवस्था भ्रष्टाचारी,कधी कळेल,
जातीचं राजकारण जेव्हा टळेल.

मुलभूत हक्क कधी मिळेल,
गरिबांना जेव्हा हक्क कळेल.

नैतिक जबाबदारी घेऊया,
विश्वासाला सोबत ठेवूया.

गोड बोल यांचे ओळखुया,
एकतेचा साद घालुया.

जबाबदारी सरकारने घ्यावी,
जमत नसेल, खुर्ची सोडावी.

नेत्यांनी सेवेची शपथ घ्यावी,
फुकट फीरतात बाहेरगावी.

सगळे एकच माळेचे मनी,
मिळुन मिसळून खाऊ वाटूनी.

एक करतो मनमानी,
दुसरा मात्र आयतं धनी.

निवडणूक आली उनेदूने काढूया,
फसवण्यासाठी खोटं खोटं लढूया.

देशाचे चार स्तंभ आता समजूया,
भांदु खुनगाठ हक्कासाठी लढूया.

शत्रू ओळखा लालचेची देतो सूट,
देशातच आपले करतो लूट.

गाढ झोपलास आतातरी उट,
तुझ्याच नावाने मात्र होतेय लूट.

मशाल परिवर्तनाची घेऊया,
गरिबांचे हक्क त्याना सांगुया.

निस्वार्थाना व्यवस्थेत आणुया,
बेईमानाना जागा दाखवूया.

भास्कर राठोड
ठाणे /मुंबई
८१०८०२४३३२

प्रमुख प्रतिनिधी: रविराज एस. पवार
8976305533