*दलितवस्तीच्या धर्तीवर तांडा सर्वांगीण विकास होणार-ना.संजय राठोड*
गोरबंजारा समाज हा विभिन्न नावाने सर्व राज्यात विविध प्रवर्गात विखुरला गेला आहे,केवळ भाषा,तांडा आणि संस्कृतीच्या जोरावर
भौतिक सुविधांपासून वंचित असूनसुध्दा तांडे स्वतः स्वयंपुर्ण असल्याचा भास होतो,त्यांचे अस्तित्वही केवळ तांड्यामुळे आजतागायत आहे,
मात्र आजही अनेक तांडे विकासापासून कोसो दुर असून,या तांड्याना मुलभुत सोयीसुविधा मिळाव्यात,तांड्यांचा
पायाभूत विकास झाला पाहिजे त्यासाठी प्रत्येक तांडे ही महसूल दर्जाप्राप्त असावे,प्रत्येक तांड्यात स्वतःची ग्रामपंचायत असावी व त्या प्रत्येक तांड्याच्या विकासासाठी कर्नाटक धर्तीवर *”सेवालाल तांडा विकास महामंडळ”*असावे अशी मागणी ना.संजय राठोड यांनी समाजबांधवांच्या वतीने वारंवार केली होती त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करीत विमुक्त जाती भटक्या जमाती साठी शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (आवास) योजनेला तसेच
तांडा सुधार योजनेला दलित सुधार योजनेसारखा भरीव निधी देऊन तांड्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला,या कामाबद्दल सर्वार्थाने जरी आभार मानला जात नसला तरी केलेल्या या अल्पशा प्रयत्नामुळे मात्र तांडास्तराव आनंद होत असून तांडा सुधार योजनेचे जिल्हानिहाय निवडावयाचे अशासकीय अध्यक्ष/सदस्यांची निवड लवकरच करावी असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
*शब्दांकन-निलेश राठोड मा.राज्यमंत्री (महसूल) यांचे कार्यालय*