दिनेश जाधव दुबईला रवाना

नांदेड (प्रतिनिधी) : शोभानगर नांदेड येथील सेवानिवृत्त अधिक्षक सुदाम रावजी जाधव यांचे धाकटे चिरंजीव यांची नुकतीच बिर्ला मेडिसॉफ्ट कंपनी अंतर्गत दुबई येथे पाठविण्यात आले आहे. दिनेश जाधव हे गेल्या 1 वर्षापासून बिजनेस ऍनालिस्ट ह्या पदावर बिर्ला मेडिसॉफ्अ प्रा.लि. कंपनी पुणे येथे कार्यरत आहे. त्यांच्या कार्यशैली व उच्च बिजनेस मार्केटिंग कौशल्य पाहून कंपनी ने त्यांची ही निवड केली आहे. दिनेश जाधव हे बारड तांडा ता.जि. यवतमाळ येथील राहणार असून त्यांच्या ह्या प्रदेश दौर्या निवडीबद्दल नाना श्री मोहन कनिराम राठोड रा. खंबाळा, आई सौ. सुमन सुदाम जाधव, बहिण सौ. मिनाक्षी दिपक राठोड, भाऊ निलेश जाधव भाचा चि. सक्षम राठोड व बंजारा पुकार परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.