दिलीप राठोड यांना एकता गौरव पुरस्कार

सेनगांव (प्रतिनिधी) – तालुक्यातील दुर्ग भागील उपेक्षीत व गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी या हेतुने लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था उभारून अनेक गरजवंतांना शिक्षणाची दारे खुली करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे मुंबई येथे एका संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक दिलीप विठ्ठलराव राठोड यांना राज्यस्तरीय एकता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सेनगांव येथील रहिवाशी दिलीप विठ्ठलराव राठोड यांनी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ व माऊली बहूउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन तालुक्यातील अनेक गावात शेक्षणिक संस्थेची उभारणी केली. 2015-06-21_140436

त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षणाची सोय झाल्याने त्यांना शहराकडे शिक्षण घेण्यासाठी जाण्याची व वेळ व पैसा मोठय़ा प्रमाणात शिक्षणासाठी खच करण्यास भाग पडूनये या उद्देशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय राठोड यांनी केली. तसेच गोरगरीबांची मुले शिक्षणापासून वंचीत राहूनये या उदात हेतूने राठोड यांनी शिक्षणा बरोबरच निवास व भोजनाची व्यवस्था केल्याने अनेक शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले व त्यांनी सतत ग्रामीण मुलाची शैक्षणिक जबाबदारी यशस्वी पणे पाश्र पाडून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने मुंबई येथील कार्यक्रमात मुख्याध्यापक दिलीप विठ्ठलराव राठोड यांना राज्यस्तरीय एकता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार विक्रम काळे, मराठी सिने अभिनेता अशोक शिंदे, अभिनेत्री विणा जगताप, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष खान मोहम्मद हूसैन आदि मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक दिलीप राठोड यांनी राज्यस्तरीय एकता गौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.