*दि. २१/०८/२०१७ रोजी, सोमवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई*
येथे, *बढती मधील आरक्षण बचाव संघर्ष समिती*च्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत मान्यवर
*मा. हरिभाऊ राठोड वि.प.स. महाराष्ट्र राज्य.*
*मा. डाॅ. हर्षदिप कांबळे.*
*मा. अॅड.अमित कारंडे*.
*मा. कैलास गौड पुर्व मागासवर्गीय आयोग सदस्य.*
*मा. रामाराव सर सेवानिवृत्त मुख्य अवर सचिव मंत्रालय.*
*मा. सोनवणे सर.*
*मा. भाट सर.*
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण.*मा.* *अॅड*. *अमित* *कारंडे साहेब* यांनी केले व मा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे भीती पसरलेल्या मागासवर्गीय कर्मचारीवर्गाने घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले कारण.. या केस मध्ये त्यांना मिळालेल्या अनुभवाचे त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला आणि या खटल्याची सर्व माहिती जनतेपुढे जावी यासाठी कर्मचारी बांधवांनी प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले,
*मा. कैलास गौड साहेबांनी* देखील सांगितले की, आमची बृहन्मुंबई म.न.पा. कर्मचारी युनियन या आरक्षण बचाव समितीच्या सोबत आहे असे आश्वासन दिले त्यानंतर
*मा. भरतकुमार साहेबांनी* देखील सांगितले की, कीती दिवस आपण व्यवस्थेचे पाय चाटणार आहोत आता वेळ आली आहे एक होण्याची, एकत्र येण्याची. .
*मा. सोनवणे साहेबांनी* देखील मोलाचे मार्गदर्शन केले…
*मा. रामाराव साहेब* तर येवढे भावनिक झाले की, आपण कीती दिवस हे सहन करायचे, मा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराचा आणि उपदेशाचे आम्ही कधी पालन करणार आहोत, शिकलेल्या सवरलेल्या लोकांनी एकत्र येऊन हा लढा उभारण्याची गरज आहे आणि जनआंदोलन देखील उभारने गरजेचे आहे असे प्रतिपादन केले .
*मा. डाॅ. हर्षदिप कांबळे साहेबांनी* देखील काही घटनात्मक बाबी समजावून सांगितले तसेच काही कमिटी नेमले पाहिजे समन्वय कमिटी, कागदपत्रे तयार करणारी कमिटी, ट्रेजर कमिटी, चांगले वकील नेमणे, आणि माझी टिम या आरक्षण बचाव संघर्ष समितीला हवी ती मदत करण्याची कबुली दिली, तसेच कर्मचारी वर्गाकडून निधी देखील गोळा करण्याचे ते या वेळी उपस्थित कर्मचारी वर्गाना सांगितले.
*मा. दि. रा. डिंगळे* साहेब यांनी पदोन्नती मधील आरक्षण जाऊन २० झाले तरी कर्मचार्यांमधील अनास्थे बद्दल आपल्या मार्मिक भाषेत बोट ठेवले.
*अध्यक्षस्थानी आमचे जेष्ठ विचारवंत तसेच विमुक्त भटक्याचे नेते *मा. हरिभाऊ राठोड माजी खासदार व विधमान आमदार वि.प.स. महाराष्ट्र राज्य.*
मा.हरिभाऊ राठोड साहेबांनी देखील सांगितले की, आम्हाला तीन बाजूने लढा उभारावे लागेल एक न्यायालयिन बाजू दुसरे रस्त्यावरचा लढा तीसरे संसदेची लढाई यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी तन मन धनाने सोबत राहिले पाहिजे असे आवाहन केले, आता हि लढाई कोण्या एका जाती व जमातीसाठी मर्यादित नसुन ही लढाई आता सर्व एससी, एसटी, विमुक्त भटक्या व ओबीसी मागासवर्गीयांची आहे यासाठी कोणी लहान नाही कोणी मोठा नाही आम्ही सर्वजण एकच आहोत असे समजून ही लढाई पुढे नेण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य, सहभाग, सर्वच स्तरावरून प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले.
आभार प्रदर्शन *मा. भाट साहेब* यांनी केले, आलेल्या सर्वच कर्मचारी बांधवांचे मनपूर्वक आभार मानले.
*आयोजक.*
*आरक्षण बचाव संघर्ष समिती मुंबई.*
गजानन डी. राठोड
प्रमुख प्रतिनिधि – बंजारा ऑनलाइन न्यूज पोर्टल