दोन्ही पुत्रांसोबत पित्याचेही यश एकाच वर्षी तिघेही झाले उत्तीण

भोसरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत चिखलीतील पितापुत्र युवराज रामभाऊ आडे आणि पवनकुमार आडे यांनीयशसंवादन केले. इतकेच नव्हे, तर युवराज यांचा धाकटा मुलगा आदित्यने दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले. एकाच वेळी एकाच गुटूंबातील पुत्रांसह पित्यानेही मंडळाच्या परीक्षेत यश संपादन केल्याची घटना चिखली परिसरता प्रथमच घडली. चिखलीतील साने चौकाजवळ आडे कुटूंब राहाते. युवराज आडे हे वसंतराव नाईक लोकसेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून बंजारा समाजातील गरजू मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च ते करतात.

2015-06-21_141210

त्यांचा थोरला मुलगा पवनकुमार बारावी, तर धाकटा आदित्य दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यामुळे घरात अभ्यासाचेच वातावरण होते. मुलांबरोबर बोर्डाची परीक्षा द्यायची, हा निर्णय युवराज आडे यांनी घेतला. त्यानंतर बीडमधील बंकट स्वामी महाविद्यालय गाठले, बारावी कला शाखेचा परीक्षा अर्ज भरला. अन्य विद्यार्थ्यांबरोबरही अभ्यास केला. बारावीच्या परीक्षेत त्यांना 64.92, पवनकुमारला विज्ञान शाखेतून 51 टक्के गुण मिळाले. आदित्य दहावी उत्तीर्ण झाला. तिन्ही पितापुत्रा ंनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. युवराज आडे म्हणाले, ‘माजी आमदार विलास लांडे यांनी बहिःस्थ परीक्षार्थी म्हणून पदवी मिळविली आहे. त्यांच्यापासून मीही प्रभावित झालो. एकाच वेळी तिघांनी परीक्षेचा अर्ज भरला. माझी पत्नी कमलने कुटूंब सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच आम्ही तिघेही उत्तीर्ण होऊ शकलो. मला सोशल वर्कर शाखेची पदवी घ्यायची आहे.’