मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात मागील आघाडी सरकारचे सरकार गेले आणि भाजपप्रणित महायुतीचे सरकार आले. परंतु राज्यभरातील विविध शहर आणि परिसरात नाका कामगार, दगडखाण, विटभट्टी, बंजारा खडी कामगार, ऊसतोड कामगार, पॉवरलू , मच्छि ार आदी क्षेत्रात काम करणार्या कामगारांची सुमारे सव्वा कोटीहुन अधिक असंघटीत कामगारांचेप्रश्न अजूनही तसेच आहेत. योजना ज्या काही योजना केल्या त्या कागदावरच आहेत. या असंघटीत कामगारांच्या प्रति सरकारकडून यांच्याप्रति संवेदना या बोथट झाली आहे. योजना राबविल्या जातात परंतु त्यात अनेक प्रकारच्या जाचट अटी लावायच्या आणि त्याचा पैसा इतर योजनांसाठी वापरायचा असे धोरण गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी आणि राज्यातील सर्व असंघटीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना त्या हक्क मिळवुन देण्यासाठी बंजारा नाका कामगार संघटनेच्या माध्यमातुन गेल्या अकरा वर्षापासून दरकोस दर मुक्काम, राज्यव्यापी जनजागृती अभियान आणि असंघटीत कामगार हक्क मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
यंदाही याविरोधात सरकारला जागे करण्यासाठी नाका कामगारांसह सर्व असंघटीत कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बंजारा नाका कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. नरेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी जनजागृती अभियानाचे आयोजन 1 डिसेंबर 2014 ते 1 जानेवारी 2015 या दरम्यान करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातुन राज्यभरातील सर्व जिल्ह्यांध्ये कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. कामगारांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देण्यात येणार आहे. यात ऍड. नरेश राठोड यांच्यासह नाका कामगार संघटनेचे मार्गदर्शक रामराव भाटेगावकर, मोहन राठोड, सागर तायडे, तोताराम जाधव आदी नेते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत. संत सेवालाल महाराजांच्या नावाने राज्यात आणि देशातही नाका व असंघटीत कामगारांचे स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करावे. बांधकाम व नाका कामगारांसाठी नव्वद दिवसांच्या कामाच्या नोंदीची अट ही बांधकाम व्यावसायिकांकडूनच सक्तीची करावी, बांधकाम कामगारांची नोंदणी न करणार्या बिल्डरावर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या लावून धरण्यात येणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातुन सर्व कामगारांच्या वस्तुस्थिचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आणि केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. या राज्यव्यापी जनजागृत अभियानाचा समारोप क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व वीरमाता जिजाऊ यांच्या जयंतीसप्ताहाच्या उत्सवाचे औचित्यसाधून 3 जानेवारी 2015 रोजी आझाद मैदानात सर्व असंघटीत कामगारांच्या राज्यव्यापी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्यातील बंजारा नाका कामगारांचे प्रमुख ऍड. नरेश राठोड यांचयासह राज्यातील असंघटीत कामगारांचे प्रमुख नेते, यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.