*नागपूर येथे होणारे साहित्य संमेलन समाजाला कोणता संदेश देऊ इच्छिते ?*
======================
समाज बांधवानो ! मी आपले लक्ष नागपूर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाकडे मुद्दाम वेधु इच्छित आहे . सकारात्मक आणि सामंजस्य या दोन गोष्टीला विशेष महत्व देणाऱ्यापैकी मी एक आहे . नागपूर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचा वाद चिघळत असतांना माझ्या सदसद्विवेक बुद्धिला पटेल अशा पद्धतीने दोन्ही गटामध्ये सामंजस्य घडवून आणण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केला. पण ज्यांना समाजात दरी निर्माण करायची आहे अशा काही मंडळीनी हे होऊ दिले नाही.
समाजाचे कोणतेही काम आपण जेव्हा हाती घेतो , तेव्हा सर्वांनाच गृहीत धरता येत नाही. एवढा – तेवढा विरोध होतच असतो . संघर्ष , ताठरपणा टाळून समंजसपणाची , सुसंवादाची भूमिका घेऊन पुढे चालायचे असते . तुमच्या कामाला विरोध होत नसेल तर त्या कामात शिथिलता आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या विरोधकाना कधीही कमी लेखु नये. विरोध करणारे प्रचंड शक्ती देत असतात , अप्रत्यक्षपणे त्या कामाला गती देत असतात . ही गोष्ट समजून घेऊन काम केल्यास आपले कामही चांगले होते आणि समाजात तेढ निर्माण व्हायला जागाही राहत नाही. चुका होत असतील तर त्या दूर कराव्यात, हवं तर टीका टिप्पणी करणाऱ्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालायला हवे. ही काम करण्याची सुयोग्य पद्धत आहे.
आता मी मूळ मुद्याकडे आपले लक्ष वेधु इच्छितो. मुद्या असा आहे की , आज आमचे स्नेही डॉ कृष्णा राठोड, औरंगाबाद यांनी स्वतःच्या नावाने whatsapp वर एक पोस्ट टाकलेली आहे. ती पोस्ट नागपूर येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाबाबदच्या एका बैठकीची आहे. त्यापोस्टमध्ये डॉ कृष्णा राठोड यांनी या साहित्य संमेलनाविरुद्ध बोलणाऱ्याबद्दल वापरलेले शब्द असे आहेत – *रिकामचोट, म्हातारे, कोल्हे* असे काही आक्षेपार्ह शब्द प्रयोग त्यांनी केलेले आहेत. हे शब्द प्रयोग ज्यांच्याबद्दल ही त्यांनी केले असतील त्याकडे थोडेसे दुलक्ष करू या .
आपल्याला विरोध करणाऱ्याला अभद्र , खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करून समाजाचे काम अजिबात करता येत नाही. पण मागील एक दोन वर्षापासून डॉ कृष्णा राठोड यांचे बोलणे , लिहिणे आणि वागणे हे समाजात तेढ निर्माण करणारे , विष कालवणारेच नव्हे , तर समाजात तालिबानशाही रुजवण्याचा प्रकार दिसत आहे. यापूर्वी त्यांना शब्द मोजून , तोलून , जपून वापरण्याचा सल्ला मी दिला होता. त्यामागील शुद्ध भावना ही होती की , ही तरुण पिढी आपल्या स्वभावातले दोष दूर करून अधिक चांगले काम त्यांनी करावेत. पण डॉ कृष्णा राठोड यांच्या डोक्यात हा विचार रुजायला तयार नाही हे त्यांच्या आजवरच्या व्हाट्सएप्प वरील सर्व पोस्ट वरुन दिसून येते. त्याच्या अशा अत्यंत खालच्या पातळीच्या शब्द प्रयोगावरुन त्याच्या सोबत राहणाऱ्या इतरांचीही अकारण बदनामी होते. कृष्णा राठोडसारखी काही मंडळी सातत्याने समाजात विष कालवण्याचे काम करीत असतील तर, त्याला समाजाने प्रखर विरोध केला पाहिजे. समाज तोडू इच्छिणाऱ्याना , समाजात फुट पाडणाऱ्या प्रवृतीच्या लोकांना कोणीही आश्रय देता कामा नये . अशांचे समर्थनही करता कामा नये.
नागपूरचे साहित्य संमेलन अतिशय चांगले व्हावे म्हणून आजवर आम्ही आयोजकांशी सतत संपर्क साधून होतो. आयोजनेतील त्रुटी दूर होऊन हे साहित्य संमेलन डोळे दीपवणारे व्हावे अशी माझ्या सारख्याची मनापासूनची अपेक्षा होती . पण हे साहित्य संमेलन आयोजकांना आज विचारावेसे वाटते की , अशा विकृत मानसिकतेने पार पडणारे हे साहित्य संमेलन समाजाला कोणता संदेश देऊ इच्छिते ? अशा अतिशूद्र विचाराने पार पडणारे साहित्य संमेलन समाजाने का होऊ द्यावे ?
आयोजन समितीतील किती मान्यवर डॉ कृष्णा राठोड यांच्या अभद्र भाषेचे समर्थन करतात याचाही योग्य तो खुलासा झाला पाहिजे . हा वाद वाढवण्याचा विषय नाही तर तो कमी करण्याचा आहे . ही गोष्ट लक्षात घ्यावी .
*आपला समाज बांधव*
*फुलसिंग जाधव, औरंगाबाद.*
Whatsapp No 9595765235
Chief Editor – Gajanan D. Rathod