पंतनगर पोलिस स्टेशनला विमुक्त-घुमंतू जनजाती विकास परिषदेच्या शिष्ठमंडळाची भेट

(श्री.सतिष एस राठोड)

मुंबई :- मंदिरासमोर गाई बांधून उदरनिर्वाह करणाऱ्या भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या सीमा अनिल चव्हाण या घाटकोपर येथील टिळक रोड परिसरातील बालाजी मंदिराजवळ फुटपाथवर गाई बांधून भाविकांना चारा विकून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्याच परिसरात राहणारी उच्च-भू वस्तीमध्ये राहणारी राखी कोठारी ही महिला गेल्या तीन महिन्यापासून वारंवार तक्रार करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे सीमा चव्हाण या महिलेने वैतागून राखी कोठारी यांच्या घरा समोर अतिरिक्त गोळ्या खाल्या.

राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर राखी कोठारी ही वारंवार त्रास देत असल्यामुळे सहन न होऊन कुटुंबाचे पोट कसे भरायचे या विवंचने मुळे हे कृत्य केले असल्याचे सीमा चव्हाण हिने पोलीस जबानीत सांगितले आहे. एवढे होऊन सुद्धा पंतनगर पोलीस स्टेशन ने तिची साधी दखलही घेतली नाही व आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या राखी कोठारी हिला साधी समजही दिली नाही. हे समजल्यानंतर भटक्या-विमुक्त जाती जमातीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या – केंद्रीय भटके-विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष कर्मवीर मा. दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखालील विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषदेच्या मुंबई विभागीय पदाधिकाऱ्यांचे एक शिष्ठमंडळाने दिनांक ०९ नोव्हेंबर,२०१८ रोजी घटनास्थळाला भेट दिली. घाटकोपर (पूर्व) येथील बालाजी मंदिराजवळील फूटपाथवर गाईला बांधून भक्ताना चार विकून सीमा चव्हाण आपले कुटुंब पोसते. हा रस्ता जास्त रहदारीचा नसल्यामुळे येथे गाईचा कोणालाही त्रास होत नाही.

ही महिला गेल्या २५ वर्षापासुन गाईला घेऊन या ठिकाणी बसते व त्या जागेची स्वछताही करीत असते, असे एका गोप्रेमी भक्ताने सांगितले, त्यानंतर शिष्टमंडळाने सदर प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोहिणी काळे या उपस्थित नव्हत्या, त्यांचे ऐवजी त्यांचे सहकारी अधिकारी श्री.रणजीत जाधव यांनी निवेदन स्वीकारले, व शिष्टमंडळाशी चर्चा केली, शिष्टमंडळात परिषदे चे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.राजू बर्गे, श्री.राजेंद्र भोसले, श्री.देविदास भिसे, मुंबईचे अध्यक्ष श्री.सहदेव रसाळ, उपाध्यक्ष श्री.मंगेश शिंगे, सरचिटणीस श्री.गिरीधर साळुंके, डवरी गोसावी समाज संघटक श्री.अनिल चौगुले, उपनगर महिला प्रमुख श्रीमती.माया इंगोले, श्री.सुरेश साळुंके व ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवला त्या सीमा चव्हाण या आपल्या सहा वर्षाच्या मुलीसह उपस्थित होत्या.पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना राजू बर्गे म्हणाले कि, डवरी गोसावी हा गाईला चारा विकून पोट भरणारा गरीब व शोषित समाज आहे. हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असून हा व्यवसाय या समाजातील बहुतेक महिला करतात.

कोणालाही कोणताही त्रास व उपद्रव न करणारा हा समाज असून मुंबईभरात तीन हजाराच्या आसपास हा समाज आहे. मंदिराजवळ गाई बांधून उदरनिर्वाह करणे हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन असल्याने गाईंची ते लहान मुलांप्रमाणे काळजी घेतात. सध्या या समाजातील तरुण पिढी नोकऱ्या, उद्योग , व्यवसाय याकडे वळला असून यातून बाहेर पडण्यासाठी त्याना आणखीन काही काळ जाईल.

मुंबईतील फेरीवाल्यांसाठी सरकार फेरीवाला धोरण तयार करून त्यांना योग्य ठिकाणी बसून आपला व्यवसाय करण्यासाठी परवानगी देते,याच धरतीवर मुंबईतील विविध मंदिराजवळ गाईला चारा देऊन उपजीविका करणाऱ्या या डवरी गोसावी समाजाच्या बांधवांसाठी सुद्धा स्वतंत्र झोन तयार करून बसण्याची सोय करावी. यासाठी कर्मवीर मा. दादा इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. या गरीब व निष्पाप समाजास उच्च-भृ लोकांनी त्रास दिल्यास हे नाईलाजाने चुकीच्या मार्गाकडे वळतील चोऱ्या-माऱ्या करतील व गुन्हेगार बनतील,कांही नास्तिक लोक अश्याप्रकारच्या तक्रारी अधून-मधून करीत असतात. त्याची शहानिशा न करता पोलीस व महापालिका प्रशासन या गरीब महिलांवर थेट कारवाई करण्यात येऊ नये, अशी कळकळीची विनंती ही शिष्टमंडळाचे प्रमुख श्री.राजू बर्गे यांनी केली, गेल्या तीन महिन्यापासून राखी कोठारी ही महिला शिवीगाळ करते व

“तुम भीक मंगे लोग फोकट का खाकर सूज गये हैं। जहर खा के भी तु कैसे बची, मर क्यो नही गई। तू पोलीस मे मेरा कम्प्लेट किया है, अब मै तुझे नही छोडुंगी।”

असे वारंवार त्रास देऊन आत्महतेस प्रवृत्त केलेल्या उच्च-भू शेजारील वस्तीत राहणारी राखी कोठारी हिने म्हटले असून ती इंग्रजीमध्ये ही शिव्या देते,असे प्रसंग ओढवलेल्या सीमा चव्हाण यांनी सांगितले,हे देखील सीमा चव्हाण हीने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिले असल्याचेही सांगितले आहे, या घटनेमुळे घाबरलेल्या सीमा चव्हाण हिला धीर देण्याची आवश्यकता असल्याचे ही शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांसमोर सांगितले.या प्रकरणी लक्ष घालून गरीब व मंदिरा शेजारी गाई बांधून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांवर अन्याय होणार नाही. याची आम्ही काळजी घेऊ असे पोलीस अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.