मुंबई (प्रतिनिती)
देशभरात पहिले बंजारा समाज सुधारक म्हणून ओळख असलेले व भटक्या विमुक्त समाजातील पहिले पद्मश्री पुरस्कारप्राप्त रामसिंगजी भानावत यांच्या १५ आॅगट रोजी असलेल्या ११० व्या जयंतीनिमित्त मुंबई, ठाणेसह राज्यभरात विविध संघटनांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बंजारा नाका कामगार संघटनेच्या वतीने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध कामगार नाक्यांवर सकाळी भानावत यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले असून मुख्य कार्यक्रम नवी मुंबईतील वाशी बसस्थानकाच्या मागे असलेल्या गुरव ज्ञाती सभागृह, सेक्टर-९ येथील सभागृहात दुपारी १२ वाजता होणार असल्याची माहिती आयोजक व संघटनेचे प्रमुख अॅड. नरेश राठोड यांनी दिली.
बंजारा समाजाचे मुख्य श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाºया वाशिम जिल्ह्यातील उगरीगड येथे रामसिंग भानावत यांचा १५ आॅगस्ट १९०६ रोजी जन्म झाला होता. त्यावेळी इयत्ता पाचवी पर्यतचे शिक्षण घेतले होते. ते कवी आणि गायक साहित्यिक म्हणूनही बंजारा आणि भटक्या विमुक्त समाजात प्रसिद्ध होते. रामसिंग भानावत यांना शिक्षणाबरोबर सामाजिक कार्याची गोडी होती, स्वातंत्र्याच्या चळवळीतही त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. मात्र त्यासोबतच त्याचा देशातील जमिनदारांकडून होणाºया शेतकºयांच्या अन्यायाविरोधात आवाज उठविला होता. त्याकाळी त्यांनी महात्मा गांधी , डॉ.बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहु महाराज यांच्या भेटीगाठी घेऊन अनेक आंदोलना सक्रीय सहभाग घेतला होता. ते स्वातंत्र्य सेनानी होते. परंतु स्वातंत्र्य सेनानी म्हणून मानधन त्यांनी कधीही घेतले नाही तर सन १९७१ रोजी त्यांना मिळालेल्या राज्य सरकारच्या पुरस्काराची रक्कम त्यांनी बांगला देशातील शरणार्थीच्या निधीत जमा केली होती.
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकारामुळे भानावत यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता.भानावत व्रत धारी समाज सेवक या नात्याने अनेक मागासलेल्या संस्थेचे ते पदाधिकारी होते. १९८० पर्यत अखिल भारतीय सेवा संघाचे ते महासचिव होते. सन १९८० नंतर त्यांनी युरोप सह अनेक देशांचा दौरा केला बंजारा समाजाच्या उत्पत्ती बाबत संशोधन आणि अभ्यास करुन विश्वबंजारा समाज सांस्कृतिक शोधपीठ नावाची संस्था स्थापन केली होती. त्यांनी लिहिलेले अनेक साहित्य अजूनही प्रकाशित झाले नसल्याने त्यासाठीची जागरूकता समाजात आली पाहिजे व भानावत यांचे विचार रूजले पाहिजे यासाठी नवी मुंबईत हा कार्यक्रम होत असल्याची माहिती अॅड. नरेश राठोड यांनी दिली.
नवी मुंबई येथे होत असलेल्या या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला माजी अधिकारी शिवचरण शेरे, सामाजिक कार्यकर्ते पी.सी. ाठोड, प्रकाश आडे, गोविंद राठोड, राजेश चव्हाण्, रवी राठोड, विश्वनाथ बंजारा प्रामुख्यांने उपस्थित राहणार आहेत.
Tag: Banjara Social worker, AIBSS Foundar member and Swatantra Senani Padmshree Ramsing Bhanawat Jayanti