◆ अखिल भारतीय तांडा सुधार समिती आयोजित पहिले अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी / शाहीर संमेलन नागपूर येथे संपन्न
(श्री. सतिष एस राठोड) ✍
नागपूर :- दि. ३/०२/२०१९ रोजी नागपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी /शाहीर संमेलनाचे अध्यक्ष प्रेमदास महाराज वलोनीकर, मुख्य संयोजक नामा बंजारा व स्वागत अध्यक्ष मंगल चव्हाण सेवा गृप मुंबई, कार्यक्रमाचे उद्घाटक श्याम मुडे यांच्या हस्ते करण्यात आले व प्रस्ताविक भाषणात प्रा. डॉ. प्रकाश राठोड यांनी भजनकरी / शाहीरांनी समाजात प्रबोधन करतांना विज्ञानवाद तसेच शिक्षणाचं महत्व समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करून समाजाला जागृत करण्याचे काम केले पाहिजे.
तसेच अध्यक्षीय भाषणात मा. मंगल चव्हाण सेवा गृप मुंबई यांनी सांगितले कि, संत सेवाभाया यांचे विचार हे विज्ञानवादी असून समाजाला दिशा देणारे होते व समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी सेवाभाया बरोबरच संत कबीर, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार भजनकरी शाहीरांचया प्रबोधनाने झाले पाहिजे, त्याचाच धागा पकडून बंजारा समाजातील भजनकरी /शाहीर यांनी अशा पद्धतीने समाजात प्रबोधन केले पाहिजे.
◆मुख्य संयोजक नामा बंजारा यांनी देखील अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी / शाहीर संमेलन घेण्यामागचे ध्येय व उद्देश सांगत ज्या पद्धतीने प्रत्येक समाजात शाहीर लोकांना शासनाच्या वतीने मानधन मिळत आहे, त्याच धर्तीवर बंजारा समाजातील भजनकरी मंडळीला देखील या समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.
◆ उदघाटक मा. श्याम मुडे यांनी स्पष्ट पणे सांगतांना समाजाला शिक्षित करण्याचे काम जर कोणी करत असतील तर ते फक्त भजनकरी मंडळी करत आली आहे. आणि या संमेलनाच्या माध्यमातून येणाऱ्या नविन पिढीला दिशा देण्याचे काम या भजनकरी मंडळी कडून अपेक्षित आहे असा आशावाद व्यक्त केले.
◆ अध्यक्षीय भाषणात मा.प्रेमदास महाराज यांनी अत्यंत आनंद व्यक्त करतांना सांगितले कि, समाजात गेल्या कित्येक वर्षांपासून भजनकरी मंडळी प्रबोधनाचं काम समाजात करत आहे आणि त्या अनुषंगाने समाजाला जागृत करण्याचे काम आतापर्यंत करत आले आहे. पण या अखिल भारतीय तांडा सुधार समिती च्या माध्यमातून अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी /शाहीर यांना गठीत करून शासनाकडे पाठपुरावा करून ही समिती समाजात प्रबोधन करणाऱ्या भजनकरी मंडळीना शासनाकडून मानधन मिळावे यासाठी हे संघटन पाठपुरावा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली व आलेल्या सर्व भजनकरी तसेच प्रमुख पाहुणे यांचे अभिनंदन करत आभारही मानले.
◆ ७०० ते ७५० भजनकरी तसेच भजनी रसिक यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या, भजनकरी यांनी गायलेल्या भजनाचे आनंद उत्साह दिसून आले.
तद्नंतर गेल्या चाळीस वर्षांपासून समाजात प्रबोधनाचं काम करणारे मा. रामराव महाराज भाटेगावकर यांना समाजात प्रबोधना बद्दल काही पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारत काही प्रश्नांची उत्तर मिळाले याचा परिणाम कार्यक्रमाला आलेल्या रसिकांनी आनंद व्यक्त केले.
सर्व भजनकरी /शाहीरांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
संकलन
भास्कर ना. राठोड
मुंबई /ठाणे