(श्री. सतिष एस राठोड) ✍
चाळीसगांव:- ग्रामपंचयतीच्या मनमानी भोंगळ कारभारामुळे पिंपरखेड, गोरखपूर हे गांव पंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाईटवर नसल्याने ग्रामस्थ वैतागले असुन शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही.
हेतु पूरस्कर ठराविक लोकानांच योजनेचा लाभ दिला जातो, गावाचे लोकप्रतिनिधी हे राजकीय द्वेष भावनेने जाणूनबुजून गरजू लाभार्थींना डावलून अनेक योजनेच्या लाभापासून वंचित ठेवत आहे, गावात स्वच्छता नाही , गाव रोगराईने ग्रासले आहे , लोक प्रतिनिधी यांचा गावाकडे दुर्लक्ष आहे, ग्रामसभा घेतल्या जात नाही व कोणत्याही योजनेची माहीती ग्रामस्थांना दिली जात नाही, ऐकंदरीत या गावातील ग्रामस्थ पारतंत्र्यात असल्यासारख्या अवस्थेत जीवन जगत आहे असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
■ खालील मागण्यांसाठी आमरण उपोषण ■
1) सदरील गाव पंत प्रधान आवास योजनेच्या वेबसाईटवर समाविष्ट करण्यात यावे
2) आतापर्यंत झालेल्या ग्रामसभेची प्रोसेडींग कागदपत्रांसह माहीती मिळावी.
3) गावात सर्वे करून गावात किती घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. ते पाहून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीवर कारवाई व्हावी.
4) तेरा वित्त व चौदा वित्त ओयोग अंतर्गत निधी कुठे खर्च करण्यात आला, त्याची लेखी माहीती मिळावी.
5) लोकप्रतिनिधीने आतापर्यंत गावाच्या विकासासाठी कुठल्या योजना राबविल्या व शासन स्तरावर पाठपुरावा करून गावासाठी कुठल्या योजना आणल्या याविषयी खुलासा सादर करावा.