पिंपळगावकमानी(तांडा) येथील जि.प.शाळेला “संरक्षक भिंत” नसल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका – अशोकभाऊ एच. चव्हाण महा. प्रदेशाध्याक्ष

मुंबई महाराष्ट्र प्रितीनीधी. 16.08.2016 पहुर येथुन जवळच असलेल्या  पिंपळगाव कमानी(तांडा)* येथील *जि.प.प्राथमिक शाळा* ही *इयत्ता-१’ली ते ५’वी.*पर्यंत असुन या शाळेला एकुण *४*शिक्षक आहेत.व ते *शिक्षक देखील अतिशय उत्तम रितीने विद्यार्थ्यांना शिकवितात.*

       गेल्या वर्षी या शाळेचे विद्यार्थी *वाकोद*विभागीय *केंद्रस्तरीय पातळीवरील पाढे पाठांतर स्पर्धेमधे एकुण पहीले ४ बक्षीस घेवुन सर्वप्रथम* आले होते.

      ही शाळा गावाच्या पुर्व दिशेला अगदी *रहदारीच्या/वाहतुकीच्या रस्त्याला लागुन*असल्याने या रस्त्यावरून *गावातील गुरे-ढोरे,अॉटो रिक्षा,बस,व ईतर वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर चालु असतो.त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवीताला धोका आहे.*

     स्थानिक *लोकप्रतिनिधी-जि.प.सदस्य/प.स.सदस्य व ग्राम पंचायत तसेच शालेय व्यवस्थापन समिती*या विषयाकडे डोळेझाक करीत आहे.

     येथील *माजी ग्रा.पं.सदस्य,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  आणि राष्ट्रीय बंजारा टायगर्स*चे *महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-मा.अशोकभाऊ चव्हाण* यांनी या शाळेत अनेक वेळा विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातुन भरपुर प्रमाणात *वृक्षारोपण* कार्यक्रमाचे आयोजन करुन मोठ्या प्रमाणावर *वृक्ष*लाविले होते. परंतु *संरक्षक भिंतीअभावी* गुरानी खाल्ल्यामुळे जगु शकले नाहीत.

       *मा.अशोकभाऊ चव्हाण* यांनी या *लोकप्रतिनीधीना अनेकदा विनवणी* करुन देखील *जाणुन-बुजून व हेतुपूरस्सर* ते या विषयाकडे फारसे लक्ष द्यायला तयार नाहीत.

     *ज्या ठिकाणाहून भावी पिढी तयार होत असते त्या ठिकाणची जर अशी परिस्थिती असेल तर कशी तयार होणार भावी पिढी?*     असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे.

          *येत्या १ महीन्यामधे या शाळेच्या संरक्षक भिंती चे काम सुरु न झाल्यास जामनेर पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयावर या शालेय विद्यार्थ्यांसमवेत आणि स्थानिक कार्यकर्त्यांसह भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मा.अशोकभाऊ चव्हाण यानी दिला आहे.*

  ????आपला स्नेहांकीत????

      *श्री.अशोक हिरामण चव्हाण*

             *प्रदेशाध्यक्ष* 

     *राष्ट्रीय बंजारा टायगर्स,*

           *महाराष्ट्र प्रदेश.*

 ???? *संपर्क-:9595423655.*
सौजन्य – गजानन डी. राठोड

चिफ एडीटर- बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल

वेबसाइट -www.banjaraone.com

भ्रमणध्वनी-9619401377