पुणे (प्रतिनिधी) : एन.एस.डी.ए. हे बंजारा डॉक्टरर्स लोकांचे असोसिएशन असून त्यांचे दोन दिवसीय 8 वे ‘बंजारा डॉक्टर्स परिषद’ दि. 17 व 18 जानेवारी 2015 रोजी हॉटेल व्ही.पी.टी.एस. पुणे येथे मोठय़ा शानदार पद्धतीने पार पडले. अशा या परिपूर्ण परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे उप कुलगुरु डॉ. अरुण जामकर सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात बंजारा समाजाने त्यांच्या भाषेचे व संस्कृतीचे जतन करावे असे सांगीतले. त्याचप्रमाणे उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शंकर नायक माजी मंत्री- कर्नाटका, डॉ. टि.सी. राठोड यवतमाळ, जे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)चे प्रेसिडंट आहे व त्यांचा बंजारा डॉक्टरांना अभिमान आहे. तसेच इतर मान्यवर डॉक्टर डॉ. मोतीलाल राठोड-नवी दिल्ली, डॉ. अशोक राठोड-डिन अकोला, डॉ. व्ही. डी. चव्हाण-मुंबई, डॉ. शशिकांत जाधव-जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ इ. मान्यवर डॉक्टर तसेच 350 डॉक्टर उपस्थित होते. या परिषदेला देशातील विविध भागातील बंजारा डॉक्टर्स हजेरी लावतात. परिषदेत समाजातील आरोग्याविषयीचे प्रश्न त्यांच्या इतर समस्या यावर चर्चा केली जाते व त्यावर उपाय शोधून त्यादृष्टीने प्रयत्न केले जातात. बंजारा समाजाची एक वेगळी संस्कृती आहे. एक वेगळी बोलीभाषा आहे. वेगळा पेहराव, सण, वेगळ्या चालिरीती या सर्व गोष्टीचे जतन परिषदेत सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारा तसेच चर्चासत्राद्वारा केले जाते. बंजारा लोकगीत, बंजारा सण, जाती-उपजाती यावर डॉ. वर्षा चव्हाण, प्राध्यापक गणपत राठोड, डॉ. कैलास राठोड यांनी सादरकरण केले. परिषदेत डॉक्टरकीचे शिक्षण घेत असलेलया मुला-मुलींसाठी एक खास वेगळे सत्र ठेवले जाते व त्यात वधू-वर परिचय घडवून मुला-मुलींची एकमेकांशी ओळख करुन दिली जाते. जेणेकरुन भावी जीवनसाथी निवडण्यास त्यांना मदत होते. अशा या ज्ञानाने व संस्कृतीने परिपूर्ण परिषदेचे आयोजन पुणे बंजारा डॉक्टरर्स ग्रुपने केले होते. यात आयोजन म्हणून डॉ. संयोगिता नाईक ह्या होत्या तसेच आयोजन सचिव म्हणून डॉ. विजय पवार हे होते तसेच डॉ. भाऊसाहेब नाईक, डॉ. सुमन नाईक, डॉ. विजय नाईक, डॉ. कल्पना पवार, डॉ. माधुरी राठोड, डॉ. सचिन राठोड, डॉ. सुरेश नाईक, डॉ. नेहा नाईक, डॉ. साहेबराव राठोड, डॉ. कविता नाईक, डॉ. कैलास राठोड, डॉ. रमेश चव्हाण, डॉ. माधुरी चव्हाण, डॉ. विठ्ठल चव्हाण, डॉ. चेतसिंग चव्हाण व मज्ञ डॉक्टर होते. परिषद यशस्वीरित्या पार पाडली. दर दोन वर्षांनी सेंट्रल कमिटी मेंबर बदलले जातात. मागील दोन वर्षासाठी डॉ.टी.सी. राठोड सर एन.एस.डी.ए. चे प्रेसिडंट होते. या परिषदेत डॉ. शंकर नायक नेत्ररोग तज्ञ बंगलोर यांची निवड झाली आहे. आठ वर्षात प्रथमच महाराष्ट्रा बाहेरील प्रेसिडंट म्हणून निवडून देण्यात आले आहे. त्यामुळे खर्या अर्थाने हे असोसिएशन नॅशनल पातळीवरचे झाले आहे.