*”विनंती अर्ज”*
प्रति,
मा.सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,व मा.सामाजिक कार्यकर्ते व मित्र मंडळी सावरगांव बंगला ता.पुसद जि.यवतमाळ,
विषय: आपल्या गावातील व्यायाम शाळेला स्थगती कशा मुळे झाली व आज पर्यंत व्यायम शाळेला महत्व का दिले गेले नाही या बद्दल माहिती देणे बाबत,
महोदय,
मि वरिल विषयास अनुसरून आपणास माहिती मागत आहे.
कृपया मला त्या माहितीच्या आधारे आपल्या गावातील व्यायम शाळा चालू करून कमीत कमी गोर गरीब शेकऱ्यांच्या मुलांना व्यासनाधिस होण्यास थांबवेल.
जर व्यायम शाळा चालू झालि कि जे सुक्षिशीत विद्यार्थी जे जुगाराच्या अड्यावर जाऊन आपली वेळ वाया घालवतात,संध्याकाळ झाली की व्यायम शाळेत न जाता दारूच्या अड्यावर जाऊन स्वताची व परिवाराची बर्बादी करून घेतात त्याना या व्यायम शाळे मुळे वाव बसेल,
मा.सरपंच व सामाजिक कार्यकर्ते साहेब.
आपणास मि काही प्रश्न विचारत आहे ते आपण या ठिकाणी माझ्या प्रश्नाचे उत्तर मनपूर्वक द्याल अशी आपेक्षा बाळगतो.
ते प्रश्न खालील प्रमाणे…
*जर आपल्या गावात व्यायाम शाळेचे सामान येऊन मागिल 2 ते 3 वर्षा पासुन पडलेले आहे.*
व त्या सामानाचे व्यावस्थित न ठेवता त्यांना *गाय बैलाच्या गोट्यात* ठेवलात…?
का ते मोलाचे नाहीत…? त्यांना विकत घेता वेळेस पैसे दिले नाही..?
त्यांना जरी *शासनानी* दिले असेल तर काय झाले त्यांचा *उपयोग* का नाही झाला…? किंवा व्यायाम शाळा बनविण्यास *जागेची अडचन असेल…? जर जागेची कमतरता आहे तर मौजे *सावरगांव बंगला येथे जी शाळेची गाव खारी* आहे त्या मध्ये का *व्यायाम शाळा झाली नाही*….? काय आपणास नाही वाटत कि *गोर गरीब शेतकऱ्यांचे* मुल व्यायाम करून पोलिस भर्ती किंवा मल्ट्री मध्ये भर्ती झाले तर नक्कीच *गावातील बढे नेत्यांना सम्मान* मिळनार नाही या *भितीच्या पोटी* तर आपण हे सर्व कार्य करत असाल…?
किंवा जर गोर गरीबाचे मुल जर शिकून मोठ मोठे आधिकारी बनलेत तर *तुमचे महत्व* तर कमी होणार नाही..? अस वाटत असेल तर ठिक आहे.
आपल्या गावातील दुष्ट राजकारणा मुळे आपल्या गावाला 50 वर्ष मागे राहाव लागत आहे.
हेच सर्वोपरि माझ्या मते आहे.
कारण मला जेवढे गावच्या गचाळ राजकारणा विषयी माहिती आहे. तेवढेच गावच्या गरीब विद्यार्थ्याशी पण प्रेम आहे.
महोदय, मि आपणास या अर्जा द्वारे माहिती मागवीत आहे.माझ्या कडे प्रश्न खुप आहेत फक्त आपण आपल्या कडे उत्तरे शोधून ठेवाल हि अपेक्षा.
जर मला माहिती 6 दिवसात नाही मिळालीतर मि हेच विनंती अर्ज सदरील तालुका पुसद, येथिल गटविकास अधिकारी व तहसीलदार कार्यालय, तसेच यवतमाळ जिल्हा अधिकारी,समाज कल्याण अधिकारी, व पालक मंत्री यवतमाळ जिल्हा तसेच मंत्रालय मुंबई येथे पण देणार आहे.
यांची काळजी घ्यावी.
कारण सावरगांव बंगला हे गांव फक्त नावा पुरतेच आहे येथे ना एक मोठा आधिकारी ना चांगले विद्यार्थी घडवनारा मार्गदर्शक, फक्त या गावात भाऊ बंधगीचे राजकारण करणारे राजकिय नेतेच असतात,
देशाला स्वातंत्र होऊन 7 दशकाच्या जवळ आलोय पण यावातील अजून गोर गरीब शेतकरी अन्यायाखाली जीवन जगत आहे.
कृपया संपूर्ण माहिती प्रमाने मि जास्तीत जास्त सुशिक्षित बेकार विद्यार्थी मित्रांना मदत व गरीब शेतकऱ्याच्या मुलांना व्यासनापासुन मुक्त करण्याच्या हेतूने करत आहे.
यात माझे स्वताचे काही स्वार्थ नाही.
अर्जदार हे या गावातील गरीब शेतकऱ्याचा मुलगाच आहे.
धन्यवाद….
कळावे आपला विश्वासु
गोर कैलास डी.राठोड
सामाजिक कार्यकर्ता ठाणे मुंबई,
मु.पो.सावरगांव बंगला ता.पुसद जि.यवतमाळ.
राष्ट्रीय *कोषाध्यक्ष*
वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ महाराष्ट्र राज्य,
मो.9819973477
टिप: वरील पोस्ट मी सर्वच ठिकाणी पोस्ट करणार आहे.
गुगल,फेसबुक,ट्विटर,आँनलाईन न्युज,व्हाट्सअप ग्रुप,फेसबुक ग्रुप,
काळजी घ्यावी….
सौजन्य: गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
Web: www.banjaraone.com