‘पोहरादेवी(सतगरू सेवालाल माराज) स्मारक विकास आराखड्यास विजाभज च्या बैठकीत स्थानिक आमदारांच्या विरोधामुळे खोडा”

MNAIMAGE6037CM Yavtmal

मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली,मा.ना.श्री.संजय राठोड,राज्यमंत्री,महसूल  यांच्या पाठपुराव्यामुळे पोहरादेवी व धामनगांव देव स्मारक विकास आराखड्यास मंजूरी तसेच राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या विविध प्रलंबित समस्यांसंदर्भात सह्याद्री विश्रामगृहावर आयोजित बैठकीस मा.ना.श्रीम. पंकजा मुंडे यांच्या ऊपस्थितीत दिनांक 8 फेब्रूवारी 2016 रेाजी बैठक कोनतेही ठोस निर्णय न घेता संपन्न झाली.

जगभरातील गोरबंजारा समाजाचे श्रद्धास्थळ पोहरादेवी येथे ९० कोटी तत्वतः मान्यता  जागतीक गोरबंजारा सांस्कृतिक केंद्र सतगरू सेवालाल माराज या थोर व्यक्तिचे स्मारक ऊभारण्याची मागणी ना.राठोड यांनी ठेवली असता स्थानिक आमदार श्री.राजेंद्र पाटणी यांनी विरोध केला,स्थानिक माजी आमदार श्री.अनंतकुमार पाटील यांनी तर सेवालाल स्मारक विकास करायचे असेल तर सतगरू सेवालाल यांच्यापेक्षा २०० वर्षांनतरचे नागोजी नाकते पाटील यांचे स्मारक होत असेल तरच पोहरादेवी विकासाच्या बाबतीत सहकार्य करायचे किंवा नाही हे ठरवू पाटील पुढे यांनी चक्क ‘पोहरादेवी येथे येणार्या भाविकांनी केलेल्या घाणी आम्ही साफ करतो,तेथे जमा होनारा भावीकांचा पैसा जातो कुठे? अशा अपमानजनक स्वरूपात टप्पणी केली.श्री.पाटील आणि आमदार श्री.पाटणी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे बैठकीत वातावरण तापले होते या बैठकीनंतर लगेचच
• वि.जा.भ.ज. नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करण्याबाबत
• मा.मॅट न्यायालयाच्या निर्णयामध्ये शासनाची बाजू मांडणेसाठी शासनाकडून नामांकित वकीलाची नेमणूक करण्याबाबत.
• शिक्षण विषयक, शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणाकरीता तरतूद, अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्याबाबत.
• 300 लोकवस्ती असलेल्या तांडयाना महसूली गावांचा दर्जा व स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याबाबत.
• जमिन विषयक, विजाभजसाठी वनपट्टे मिळण्याबाबत व लोक कसत व राहत असलेल्या जमिनीचे मालकी हक्क देण्याबाबत.
• भूमिहीन शेतमजुरांसाठी “वसंतराव नाईक स्वावलंबन योजना” राबविण्याबाबत.
• विजाभज च्या विदयार्थ्यांसाठी डॉ.आंबेडकर भवनच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात “वसंतराव नाईक सामाजिक न्याय भवन” उभारण्याबाबत.
• विजाभज नागरिकांना रमाई आवास योजनेप्रमाणे “सामकी माता आवास योजना” ही कायमस्वरुपी करुन लोकसंख्येप्रमाणे भरीव आर्थिक तरतूद करावी.
• विजाभजच्या मुला-मुलींना जिल्हास्तरावर शासकीय वसतीगृहाची स्थापना करण्याबाबत.
• कर्नाटक राज्याच्या धर्तीवर “सेवालाल तांडा विकास महामंडळाची स्थापना”  करण्याबाबत.
महामंडळ व तांडा वस्ती सुधार योजनेवर बंजारा समाजातील व्यक्तीची  अध्यक्ष  म्हणून  नियुक्तीची तरतूद करण्याबाबत.
• विजाभज चा प्रतिनिधीची नेमणूक राज्य मागासवर्गीय आयोग व महाराष्ट्र लोकसेवा  आयोगावर करण्याबाबत
• विजा-अ साठी  आंतर परिवर्तनियतेचा नियम रद्द करण्याबाबत
समाजाच्या गोर बोली / पेणार वाणी या भाषेला संविधानाच्या 8 सूची मध्ये  समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याबाबत.
लाखा गोर बंजारा कलावंत मानधन योजना सुरू करण्याबाबत.
अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा,बोगस भामटा प्रमाणपत्र रद्द करावे,१९६१ चा पुरावा रद्द करूण ईतर राज्यातुन स्थलांतरीत बंजारा समाजालाही सवलती द्याव्यात आदी विषयांवर चर्चा होणार होत्या.
निमंत्रीतांमध्ये मा.ना.श्री.संजय राठोड यांचेसमवेत संबंधीत विभागाचे मा.मंत्री,मा.राज्यमंत्री,मा विधानसभा सदस्य ,मा.डॉ.तुषार राठोड,मा.श्री.हरिभाऊ राठोड,माजी खासदार,मा.श्री.राजू नाईक व ईतर,संबंधित विभागाचे सचिव व प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न झाली, बैठकीत श्री.पाटील व आमदार पाटणी यांनी नकारात्मक भूमीका घेतल्याने समाजाच्ा बैठकीतील  अपेक्षा पूर्ण न झाल्याने सर्वस्तरातून तीव्र नाराजी यक्त केली आहे.