पोहरादेवी आणि बंजारा समाज यांचे अतूट असे नाते आहे

पोहरादेवी ::
पोहरादेवी आणि बंजारा समाज यांचे अतूट असे नाते आहे. बंजारा व्यक्तीच्या जीवनात पोहरादेवी या गावाला अन्यय साधारण असे महत्व आहे. सुमारे 276 वर्षापूर्वी संतमुर्ती सेवादास महाराज हे बंजारा वंशात अवतारी पुरूष होवून गेले. सेवादास महाराजांना बंजारा समाज कुलदैवत मानतात. सेवादास महाराज हे बंजारा वंशात तिसरा अवतार असल्याचे सांगितल्या जाते. ज्यावेळेस समाजात अन्याय होते.

त्यावेळेस समाजात अवतारी पुरूष जन्म घेत असल्याचे दिसून येते. तसंच काहीसं बंजारा समाज गावागावी भटकत असतंाना गाईच्या पाठीवर गहू, ज्वारी , तांदूळ टाकून व्यापार करत असतांना त्यांच्यावर विविध स्वरूपाचे अन्याय होत असत.
हया अन्यायापासून मुक्ती देण्यासाठी त्यांना स्वाभीमानाचे जिवन जगता यावे यादृष्टीने व गोर बंजारांना वाचविण्यसाठी श्री जगदंबा देवीने सेवादास महाराजाला बंजारा समाजात अवतार घेण्यासाठी सांगितले व तद्नुसार संत श्री सेवादास महाजांचा जन्म कर्नाटक राज्यात गुत्तीबल्लारी या गावी मार्गशिष महिन्यात शुक्ल पक्षात शुभनक्ष़त्री 15 फेब्रु. 1739 रोजी झाला. संत सेवादास महाराज यांच्या जन्माची एक आख्यायीका आहे. सेवादास महाजाचे वडील श्री भिमानाईक व आई धर्मळीमाता यांना मुलबाळ नव्हते. बंजारा समाजात पूर्वी पासूनच श्री जगदंबा देवीची आराधना करतात. श्री भिमानाईक व धर्मळीमाता आपल्याला मुल व्हाव यासाठी जगदंबा देवीच्या नावाने तपश्चर्येला बसले. सतत तपश्चर्या सुरू होती. भिमा नाईक अत्यंत कृश झाले होते. सगळीकडे हळहळ सुरू झाली. तेव्हा जगदंबा देवी एका बाईच्या साध्या रूपात प्रसन्न झाली. तुम्हीला पैसा ,संपत्ती सा-या गोष्टी असतांना तपश्चर्येला का बसले, तुम्हाला काय कमी आहे. असे साध्या बाईच्या रूपात असलेल्या जगदंबा देवीने विचारले. तेव्हा भिमानाईकंानी आम्हाला जगदंबा देवीचा आशिर्वाद हवा आहे. आम्हाला संतती नाही जो पर्यंत आम्हाला देवीचे दर्शन होणार नाही, तोपर्यंत तपश्चर्या सोडणार नाही असे सांगितले. देवीला श्री भिमानाईक व धर्मळीमाता आपले सच्चे भक्त असल्याची खात्री पटताच, आपले प्रत्यक्ष रूप दाखवून संतती होण्यासाठी आशीर्वाद दिला व तदनुसार संत श्री सेवादास महाराजांचा जन्म झाला. बदू, हाप्पा भामा असे तिन भावाचा जन्मा झाला. काही दिवस जाताच भामा मरण पावला व पुन्हा जगदंबा देवीच्या आशीर्वादाने पुरा नावाचा भाउ जन्माास आला.

सेवादास महाराजांचे चमत्कार

जगइंबर देवीच्या आशीर्वादाने सेवादास महाराजांचा जन्म झाला असल्या कारणांनी लहानपणापासूनच जगदंबा देवी महाराजांना प्रसन्न होत्या. देवीच्या आशीर्वादाने सेवादास महाराजांनी अनेक चमत्कार दाखविले. भजन करत असतांना महाराजांच्या भजनात कुठल्याच प्रकारचे वाद्य नव्हते. दगड गोटे घेवून महाराज वाजवत होते. दगड गोटयातून वाद्यासारखा आवाज निघल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. मातीच्या पोळीला मातीच्या भाजीला प्रत्यक्ष अन्नाचे रूप दिल्याचे बुजरूक मंडळीकडून ऐकण्यात येते. गाई गुरे चरत असतांना गाईच्या रक्षणासाठी स्वताला संकटात टाकून जगदंबा देवीला यप्रसन्न करून गाईच्या गुरांचे रक्षण केल्याचे सांगितले जाते. एक वेळेस जगदंबा देवींच्या सांगण्यावरून सेवादास महाराजांनी एका राजाच्या शेतात गाई चरण्यासाठी सोडून दिल्या. राजाला माहित होताच राजा लढाईसाठी आला. राजा व सेवादास महाराजात घनघोर लढाई झाली. राजा पराभूत झाला. सेवादास महाराजाला देवीचा आशीर्वाद असल्याने आपण पराभूत झालो असे राजाला वाटू लागले. सेवादास महाराजाला मारण्यासाठी पेढयामध्ये विष कालवून राजानी खावू घातले. परंतू देवीने दर्शन देवून सेवादास महाराजांचे प्राण वाचविले. अशा प्रकारे सेवादास महाराजांच्या अनेक आख्यायिका प्रिसध्द असून महाराजांचा मृत्यू एक चमत्कार असल्याचे सांगितल्या जाते .