प्राचार्य टि.व्ही.राठोड यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड

कारंजा (प्रतिनिधी) – जय बजरंग
विद्यालय, व श्री.वसरामजी नाईक उच्च
माध्य.विद्यालय, भुली ता.मानोरा
जि.वाशिम येथील प्राचार्य
श्री.टि.व्ही.राठोड यांची भारतीय बंजारा
समाज कर्मचारी सेवा संस्था महाराष्ट्र प्रदेश
कार्याध्यक्ष पदी औरंगाबाद येथे दि. 10-
08-2014 रोजी राष्ट्रीय व राज्य
कार्यकारीणी निवडणुक कार्यक्रमामध्ये
मा.गोविंदभाऊ राठोड, माजी अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली एक
मताने निवड करण्यात आली.
2014-09-05_181617

प्राचार्य श्री.टि.व्ही.राठोड यांनी
यापूर्वी विदर्भ माध्ययमिक व उच्च
माध्ययमिक संघाच्या तालुका अध्यक्ष,
जिल्हा उपाध्यक्ष, विदर्भ प्रतिनिधी व
जिल्हा कॉन्सीलर तसेच शिक्षक संघाच्या
तालुका उपाध्यक्ष पदी त्यांनी कार्य केले
आहे. ऑल इंडिया बंजारा सेव संघ जिल्हा
सचिव पदी तसेच तांडा सुधार समिती
जिल्हा उपाध्यक्ष पदी कार्यरत आहेत.
त्याचप्रमाणे सन 1998 पासुन महाराष्ट्र
बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था शाखा
मानोरा तालुका अध्यक्ष पदापासुन ते
जिल्हा उपाध्यक्ष, प्रभारी जिल्हा व
अमरावती विभागीय संघटना सचिव पदी
तसेच भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा
संस्था महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव पदी
कार्य केले आहे.
त्यांनी आपल्या कार्यकाळात पोहरादेवी
येथे सन 2002 मध्ये झालेल्या
सामुहिक सोहळ्यामध्ये प्रमुख
भू ाrका बजावली असुन 51
जोडप्यांमध्युन 25 जोडपे
मानोरा तालुक्यामधुन देवुन
विवाहबध्द केले. तसेच राज्य
स्तरीय उपवर वधु परिचय
मेळाव्याचे दरवर्षी आयोजन
करतात. संत सेवालाल महाराज जयंती
साजरी करणे तसेच मा.वसंतरावजी नाईक्
जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम घेऊन त्यामध्ये
गुणवंत विद्यार्थी व सेवा निवृत्त कर्मचार्यांचा
सत्काराचा कार्यक्रम आयोजन करणे, तीज
उत्सव व होलीकोत्सव साजरा करण्यामध्ये
त्यांची मोठी भू ाrका असते. कारंजा येथे
वसंतरावजी नाईक सामाजीक सभागृह
मिळविण्यासाठी त्यांनी व त्यांच्या
सहकार्यांनी अथक प्रयत्न करून 22 लाख
रूपयाचे सभागृह आमदार प्रकाशदादा
डहाके व माजी आमदार मा.राजेंद्रजी
पाटणी यांच्या निधीमधुन मिळवून घेतले.
मा.वसंतरावजी नाईक, मा.सुधाकरजी
नाईक व समाजावर चुकीचे आक्षेपार्ह
लिखान करणार्या संपादकाविरूध्द मोर्चाचे
आयोजन करून निषेध नोंदविला. तसेच
बंजारा समाजाचे सामाजिक प्रश्न
सोडविणे व कर्मचार्यांवर
होणार्या अन्यायाविरूध्द
आवाज उठविणे तसेच परभणी
कृषी विद्यापिठाला
मा.वसंतरावजी नाईक यांचेनाव
मिळविण्याकरिता परभणी
येथील मोर्चामध्ये सहभाग,
अजंठा चित्रपटावरील बंदी थांबविण्यासाठी
मा.जिल्हाधिकारी व मा.तहसिलदार
यांनान्निवेदन दिले. बंजारा क्रांती दलाच्या
नेतृत्वाखी कारंजा येथील रूग्णालयाकडे
जाणार्या रस्त्याला वसंतरावजी नाईक यांचे
नाव मिळविण्याकरिता सहभाग तसेच
नॉनक्रिमीलीयर ची अट रद्द करणे, बंजारा
समाजाला एस.टी.प्रवर्गामध्ये समावेश
करण्याकरिता मोर्चा ध्ये सहभाग, अशा
प्रकारे त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.