“प्रार्थमिक शिक्षण सुधारणेचा पाया आहे”

*जय सेवालाल जय वसंत*

________________

माझ्या गोरबंजारा बांधवांनो

 *प्राथमिक शिक्षण* सर्व सुधारणाचा पाया आहे.*

ही बाब लक्षात घेवून 

*वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* 

*वतीने* 

*आयोजित जनजागृती*

       *उपक्रम*

____________________

  प्रा.शिक्षण विषयी सध्यस्थित  जोपर्यंत यासंबंधी आपले विचार constructive होत नाही तोपर्यंत या टप्प्यावर बदल अपेक्षित नाही.यांनी प्राथमिक शिक्षणाविषयी *शिक्षण प्रबोधन* या सदरात आपणास उपयुक्त माहिती देत आहे.. शिक्षण हा आपल्याला सुखी बनवणारा एकमेव मार्ग,म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणा बद्दल विशेष काळजी घेतली पहिजे.

     प्रा.शिक्षणा विषयी प्रबोधन

आपले प्रबोधन व्हावे या वैचारिक प्रेरणेने व.ना.बं प.चळवळ आजपासून आपल्या वैचारिक परिवर्तन व ज्ञानासाठी 

*प्राथमिक शिक्षण-*  

      *एक चिंतन*हे उपयुक्त असे लेखमालिका सुरू करित आहे. सदर माहिती प्राथमिक शिक्षण आराखडा यांच्या सौजन्याने युक्त आहे.  तरी याबाबतीत आपले ज्ञान update करून आम्हास उपकृत करावे.

  ही अपेक्षा.. 

प्रा.दिनेश राठोड 

कैलास डि.राठोड 

पडित अ.राठोड

*व.ना.बं.प. चळवळ*

*****-********-***—-

*जय सेवालाल*

 *जयसे वालाल जय वसंत*

____________________

*वसंतरावजी नाईक*     

        *बंजारा*

 *परिवर्तन चळवळ*

द्वारा आयोजित प्राथमिक शिक्षण जनजागृती अभियान

______________________

*प्राथमिक शिक्षण-*

  *एक चिंतन** *भाग -१*

   उद्याचा मराठी नागरिक घडवणारे प्राथमिक शिक्षण

आपण सतत शिकत असतो.  महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आधुनिक जगात यशस्वीपणे स्वत:ची उन्नती करण्यासाठी आणि महाराष्ट्र घडवण्याच्या कामात आपले योगदान देण्यासाठी सज्ज व्हायचे असेल तर उत्तम प्राथमिक शिक्षण हवे. त्यासाठी काय करायला हवे, यासबंधी…..

  *प्रा.शिक्षण -स्वरूप*

महाराष्ट्रात जन्मणार्‍या, इथे लहानाचे मोठे होणार्‍या प्रत्येक मुलाचे आयुष्य आपण घडवत आहोत, घडवणार आहोत याची खात्री आज आपण देऊ शकत नाही. त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारी सामग्री आपली शिक्षण व्यवस्था आपल्या मुलांना आज पुरवते आहे का या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल.

 आपले शैक्षणिक धोरण उत्तम आहे. बालकांचा शिक्षणाचा मूलभूत हक्क आपण मान्य केला आहे, अत्यंत समग्र आणि सर्वसमावेषक असा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे. राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी काही बाबी समान ठेवून स्थानिक गरजेनुसार या आराखड्यात बदल करण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. २१व्या शतकातला नागरिक बनवण्याची ताकत असलेली रचनात्मक शैक्षणिक पद्धती स्वीकारली आहे. शिक्षण केवळ पुस्तकी न राहता वर्गाबाहेरील घडामोडींचा समावेश कसा होईल, विद्यार्थ्याच्या भविष्यातील जीवनात ते प्रत्यक्ष उपयोगी कसे पडेल, विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व घडवले जाईल यादृष्टीने त्याचे अनुभव विश्व कसे समृद्ध करता येईल या सर्वाचा विचार त्यात केला आहे.

 मात्र हे आपण प्रत्यक्षात उतरवू शकलेलो नाही.

*जय सेवालाल*

( *क्रमशः*)** पुढील भागात

~ गोर कैलास डी राठोड

 बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,

www.banjaraone.com