प्रा.नितीन धनुसिंग आडे यांना पी.एच.डी प्रदान

पुणे (प्रतिनिधी) – म.ए.सो.चे.आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रा.नितीन धनुसिंग आडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान केली. त्यांनी डॉ.एम.के.मित्री यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडय़ातील जिल्हानिहाय औद्योगिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर विद्यापीठाला शोधनिबंध सादर केला. प्रा.नितीन आडे हे लोहा तांडा (लहान) ता.हदगाव जि.नांदेडचे सेनि लेखाधिकारी धुनसिंग लालसिंग आडे यांचे द्वितीय चिरंजु आहेत. नितीन आडे यांनी 2009 मध्ये अर्थशात्र विषयात नेट-सेट परिक्षेत विशेष यश प्राप्त केले होते आणि आता ह्या अतिशय कटिन विषय निवडून त्यांनी बंजारा समाजातील पहिले प्राध्यापक ठरले आहे. नितिन आडे हे गेल्या 10 वर्षा पासुन ह्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी 2 वर्षे नवोदय विद्यालय, गोवा, 1 वर्षे केंद्रीय विद्यालय, राजस्थान व काही महिने मुंबई येथे सांख्यिकी सहाय्यक, अर्थ व सांखिकी संचालनालय, मुंबई येथे कार्य केले. नितिन आडे यांच्या या यशाबद्दल व उज्वल कार्यासाठी सर्व बंजारा समाजातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

2014-09-23_112017