*|| फक्त तू खचू नकोस ||*
एक डाव हरला तरी
त्यात काय एवढं ..?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड …
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस …
सूर्य रोजच उगवतो,
त्याच नव्या तेजाने …
रोज मावळतीला जातो
रोजच्याच् नेमाने …
येणे जाणे रितच् इथली,
हे तू विसरु नकोस …
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस …
प्रेम तुझ्यावर करणारे ,
कितीतरी लोक आहेत …
तुझ्यासाठी जोडणारे ,
खुप सारे हात आहेत …
अरे अशाच आपल्यांसाठी ,
तू ही थोड हसुन बघ …
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस …
वाट तुझी बघत असतं,
रोजच कुणीतरी …
तुझ्यासाठी जगत असतं ,
आस लावून प्रत्येक क्षणी …
त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
अश्रु तू गाळु नकोस …
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस …
उठ आणि उघडून डोळे ,
पहा जरा जगाकडे …
प्रत्येकाच्या आयुष्यात ,
काहीतरी असतेच् थोडे …
नाही नाही म्हणून ,
उगाच कुढत तू बसु नकोस …
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस …
सामर्थ्य आहे हातात जर,
स्वप्ने डोळ्यात घेऊन चल …
परिस्थितीशी भिडवून छाती,
दोन हात करत चल …
विजय तुझाच असेल
तेव्हा मागे वळून बघु नकोस …
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस …
‼ *काळजी घ्या* ‼
~ गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल.
www.banjaraone.com