”फायदेशीर खेकड़ा वृत्ति व सकारात्मक वणवा”
बंजारा समाज संघटित करण्या करिता
आपले अमूल्य योगदान असणे आवश्यक आहे.
आज समाजामधे अविचारी प्रवृत्ति,स्वार्थी,द्वेष,समाजद्रोह,इत्यादीचा
अहंकार वाढत चालला आहे. हा चिंता व चिंतनेचा विषय आहे.आपले वर्चस्व वाढ!वा हां मुख्य हेतु घेऊन सामाजिक कार्याच्या नावाखाली संघटनेचे अनगणित दुकाने थाटुन बाजार मांडला आहे. व आपण किती समाजाचे सेवक आहोत,हे दाखविण्यासाठी चढावोढ लागलेली दिसून येते.
परंतु हेच संघटन प्रमुख आंदोलन उभे होत असताना कोणीही समाजास आवाहन करताना दिसत नाही.ही समाज शोकांतिका आहे, त्यात एक दोन नियोजित संघटान सहमती दर्शविली.
याला काय म्हणावे.याचे उत्तर प्रमाणिक पणे
देण्याचा प्रयत्न करावा व
आज समाजात खेकड़ा प्रवृत्ति आहे असे अनेक वेळी आपल्या संभाषणातून आपापल्या
संघटनेच्या टोळक्यात (झुण्ड) बोलले जाते, व टाळ्या वाजविल्या जातात व संघटनेचे
प्रवक्ते खुश होतात.
परंतु खेकड़ा वृत्ति खुप चांगली आहे
खेकड़ा समूह फार हुशार,संघटन कौशल्य असणारा समूह आहे व अभ्यासु आहे.त्याला आपल्या समुहाची काळजी आहे.
जर एखादा खेकड़ा अविचाराने,द्वेषाने,समुहाचे टुकड़े पाडण्यासाठी समाजद्रोह करण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो त्यास संघटन किती आवश्यक आहे त्याला चांगले विचार देउन पाय वोढून एकत्रित करण्याचा
प्रयत्न करतात हा सकारात्मक दृष्टीकोण असतो हां बोध घ्यावा लागेल.
म्हणतात ना वणवा पेटला तर जगाला दिसतो मनातला वणवा कोणाला दिसत नाही.
बंधूनो माझे तर हे मत आहे मनात जे स्वार्थी
बुद्धिचा,मत्सराचा,द्वेष,अहंकारा चा वणवा तेवत ठेवता तो जगात जो वणवा पेटला आहे जो नजरेत भरतो व हळहळ व्यक्त केली जाते त्यात आहुती समिधा रूपाने द्या समाजच्या एकोपासाठी संघटित व्हा.
आपल्यावर लादलेल्या असंविधानीक अटी, सामाजिक विषमता,शिक्षण समस्या,जाचक अटी मुळे मुलभुत हक्का पासून वंचित असनाऱ्या महिला व पीडित समाजावर वर्षानुवर्ष केलेले अन्याय जन आंदोलन उभारुण वणवा रूपाने जनते समोर,सरकारा समोर येऊ द्या वणवा क्रांतिवीर संत शिरोमणि सेवालाल यांची धगधगति मशाल म्हणून प्रशिद्धिचे काम करेल असे मला सांगावेसे वाटते
कोणास ही दुखविने हां हेतु नसून संघटन कौसल्या ने समाजाचे मन जिंकावे तसेच
वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देऊन न्यूनगंड न बालगता सहभाग घेऊन आवाहन करावे, ही प्रमाणिक इच्छा आहे.
जय सेवालाल
आपला समाज शुभ चिंतक.
–सुखी चव्हाण,बदलापुर.
मो। 9930051865
संपाकद:
गोर कैलास डी.राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य,
website: m.banjaraone.com
मो.9819973477