हुंडा विरोधी उपक्रम-भूणहत्या रोखणार प्रा.रमेश राठोड यांच पुढाकार
नागपूर (प्रतिनिधी) – महिलांना न्याय मिळावा म्हणून हिंदू कोडबिल सारखे विधेयक संसदेत मांडणार्या व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू असलेले संत कबीर जयंतीदिनी बंजारा तांडय़ावर सत्यशोधक पध्दतीने बंजारा विवाह लावून आदरांजली वाहण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील तिवसाळा बंजारा तांडय़ावर सत्यशोधक पध्दतीने विवाह होणार आहे. प्रा.रमेश रामजी राठोड यांच्या पुढाकारातून हा विवाह सोहळा होत आहे.
भ्रूणहत्येची समस्या दुरू करण्यासाठी शासनस्तरांवर आणि विविध पातळीवर बरेच प्रयत्न सुरू आहेत. मात्र या समस्येचा थेट मुळाकडेच बंजारा समाजातील एक तरूण प्राध्यापक रमेश राठोड ह्यांनी लक्ष वेधले आहे कन्या भ्रूणहत्येची मूळ कारण “हुंडा पध्दत” असे ठासून सांगत या प्राध्यापकाने बंजारा समाजात प्रबाधेनपर कार्याला सुरूवात केली आहे. आपल्या समाजातून त्यांनी ही प्रथा दुर करण्याचा विडा उचलला आहे. लग्नात होणारा अवास्तव खर्च, द्यावा लागणारा हुंडा, त्यासाठी पित्यावर कर्ज बाजारी होण्याची वेळ यामुळे “मुलगी नकोच” ही भावना निर्माण होत असते या भारतात मुलीची हत्या गर्भातच होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रा.रमेश राठोड हे विज्ञाननगर मानेवाडा नागपूर येथील रहिवाशी आहे.
बंजारा समाजातील सर्वसाधारण गरीब कुटूंबांत त्यांचा जन्म झाला आहे. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती केली आहे. परंतु ते केवळ आपल्या कुटूंबापुरते मर्यादीत झाले नाहीत तर समाजात ते काम करीत आहे. आपल्या समाजाने प्रगती करावी म्हणुन वि.जा.भ.ज. सर्वांगीण विकास सेवा संस्थाच्या माध्यमातुन ते तरूणांना आणि एकूणच समाजाला प्रबोधन करीत आहेत. हुंडापध्दतीच्या विरोधातून मुलीची गर्भातच होणारी हत्या रोखण्याचा नवा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. कन्या भ्रूणहत्येचे मुळ कारण हुंडा प्रा.रेश राठोड म्हणाले, भारतात हुंडा पध्दतीवर बंदी आहे. हुंडा मागणे आणि हुंडा देणे हे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आले आहे. परंतु समाजात सर्रासपणे ही पध्दत आजही सुरू आहे. भ्रूणहत्या ही तर अतिशय गंभीर अशी समस्या आहे.
यातुन सामाजिक समस्याही निर्माण झाल्या आहेत. मात्र यासमस्येच्या मुळाकडे आजवर लक्षच देण्यात आलेले नाही. हुंडय़ाची प्रथा हेच याची मुळ कारण आहे या प्रथेला विरोध करूनच मुलीची हत्या रोखता येईल. हुंडय़ाला विरोध करा आणि मुलीचा जीव वाचवा बंजारा समाज हा मागासवर्गीय समाज आहे. परंतु समाजात हुंडा पध्दती प्रचंड बोकाळलेली आहे. समाजातील शिक्षित मुलेही हुंडा घेऊ लागली आहेत. त्यामुळे हुंडय़ाला विरोध करा आणि मुलीचा जीव वाचवा असे आवाहन प्रा.रमेश राठोड यांनी केले. नायक अभिनंदन राठोड हा तरूण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील आरंभी बंजारा तांडा येथे राहतो. त्याला वडील नाहीत. त्यामुळे त्याचे पालकत्व प्रा.रमेश राठोड यांनी स्वीकारले. या दत्तक मुलांचे लग्न तिवसाळा ता.घाटंजी जिल्हा यवतमाळ येथील नायकन काजल पवार नावाच्या तरूणीसोबत संत कबीर 618 वी जयंती दिनी दि. 2-6-2015 रोजी होणार आहे. कुठलाही हुंडा न घेता व न देता हे लग्न होत आहे. लग्नाची लग्नपत्रीका ही “बंजारा बोलीत” तयार करण्यात आली आहे.
या लग्नाचे वैशिष्टय़ म्हणजे लग्नात कुठल्याही देवीदेवताचा फोटो राहणार नाही. त्याऐवजी बंजारा समाजातील संत सेवालाल महाराज आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक या मान्यवराचे छायाचित्रे राहतील. या छायाचित्रांना पुष्पहार अर्पण करून आणि शेकडो समाज बांधवाच्या साक्षीने लग्न होईल अक्षदा म्हणून तांदळाच्या दाण्याचा उपयोग न करता फुलांचा वापर केला जाईल. एवढेच नव्हे तर लग्न स्वतः प्रा.रमेश राठोड लावतील त्यासाठी त्यांनी आधुनिक मंगलाष्टके तयार केली आहेत. या माध्यमातुन समाजाची स्वतंत्र ओळख निर्माण होण्याची अपेक्षा आहे.