मन लोवडी दरादरे वीर आज म चाली रे ..
बंजारा तीज उत्सव म्हणजे समाजातील अविवाहित मुलींच्या जीवनातील प्रत्येक वर्षात येणारा श्रावण मास नव्हे आनंद पर्वच.
मन लोवडी दरादरे वीर आज म चाली र…….
तीज वसर्जनातील हे मुलींचे गाने लोकगीत ऐकून क्षणभर मनाला विलक्षण भुरळ पडतो.
घाटंजी शहरात वेगवेगळ्या गावातून शासकीय सेवेकरिता व्यापार व्यवसाय करण्या करिता येऊन स्थायिक झालेले गोर बंजारा आपले वेगळेपणा जपन्यात कुठेच् मागे नाही.
सम्पूर्ण देशात एक वेगळे अस्तित्व निर्माण करणारी बंजारा समाजाची संस्कॄति खास करुण स्त्रियांचा पोशाख फेटया,काचळी,हासलो,भूर्या,
बायटा, कल्डा,आटि-चोटला, सर्व जड जवाहिरे परिधान करुण पूर्वपार परंपरेपासून आलेली बंजारा संस्कॄति आजही निदर्शनास येते.
तांडया चा प्रमुख म्हणजे नायक 10 दिवस असणारा हा उत्सव नायकाच्या घरुनच सुरु होतो. घाटंजी येथील मनमिळाउ स्वभावचे नायक नामदेवराव आडे खरोखर नेतृत्व गुण बाळगनारे सर्वाना सोबत घेऊन समाजाच्या प्रत्येक कार्यात पुढाकार घेणारेे. वेळप्रसंगी न्यायाधीशाची भूमिका निभावुन योग्य न्याय देणारे.म्हणजे नायक नामदेवराव आडे.तांड्या चे दूसरे प्रमुख म्हणजे कारभारी अरविंद भाऊ जाधव यांच्या कर्तुत्वाने तर घाटंजी तालुक्यात राष्ट्रिय बंजारा टाइगर्स च्या माद्यमातुन समाजात सामाजिक चळवळीची एक लाट निर्माण झाली. त्यांच्या सोबतिला डाव बंडूभाऊ जाधव,सर्वसमावेशक कैलासभाऊ राठोड, नरसिंग माम यांच्यामध्ये असलेली समाजसेवा वृत्ती बघुन त्यांचे मानावे तेव्हडे आभार कमिच आहे. आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट सहन करण्याची प्रत्येक कार्यात त्यांची तयारी असते.
महानायक वसंतराव नाईक जयंती, पुण्यतिथी असो वा संत श्री सेवादास महाराज जयंती असो होळी असो वा समाजाचा कोणताही सार्वजनिक कार्य असो सतत कार्यप्रणव असलेले बंजारा कर्मचारी सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा.रतन राठोड,सुनील जाधव,रामलाल राठोड,प्रेमदास राठोड, यांची समाजाप्रति असलेली तळमळ
वाखाण्यजोगे आहे.
नायकपुत्र संजय आडे यांचा प्रत्येक सामाजिक कार्यात खारिचा वाटा असतो.सामाजिक चळवळ म्हणजे संवाद आहे वाद नाही,मतभिन्नता असते परंतु मतभेद नाही.एकीचे बळ, सामाजिक सलोखा, सामाजिक एकता, असल्यामुळे समाज एकसंघ आहे.
देद देद रे वीर पीडिया देदर
तोन तांडेर नायक करु रे वीर पीडिया देद र ………..
तोन तांडेर पटल्या करूरे वीर पीडिया देद र…………
बोरडीर बोर खाटे मिठे बोर
तम लागजा जो तम झड़जा जो
छोरी चाळो लगाइये चरमटडी
ये नायेकेरे घरिआंग चरमटडी
या गितावर तीज विसर्जन मिरवणुकीत बाल,तरुणाई,वयोवृद्ध स्त्री पुरुष मंडळी थिरकल्या शिवाय राहत नाही.
वसंतराव नाईक यांच्या विचाराने प्रभावित,सेवालाल महाराज यांच्या रक्ताच्या समाजातील प्रत्येक माणसाचे बंजारा चळवळी करीता रक्त सळसळल्या शिवाय राहत नाही.हिच खरी गोर संस्कृती असून ती जतन करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे.
????जय सेवालाल????
????रवि आडे????
सचिव:-भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था,घाटंजी
Tag : Banjara Teej, Banjara Festival