बंजारा संस्कृति तिज महोत्सव 2016

​तिजोत्सव बदलापूर 17 ऑगस्ट2016

बदलापूर येथे बंजारा बांधवांनी परारंपरिक सण साजरा केला

मा श्री राजू नाईक राष्ट्रीय अध्यक्ष अ भा ब से संघ ,मा श्री अम्बरशिंग चव्हाण महासचिव 

भा ब क से स,मा आमदार किसनराव कथोरे साहेब,नायक श्री सुधीर भाऊ चव्हाण,मा श्री मारुती काका राठोड ,कार्याध्यक्ष सुखलाल(सुखी)चव्हाण ,में दिशा इंटरप्रझेस चे संचालक तसेच संघटन सचिव डॉक्टर दिनेशजी चव्हाण,संघटन सचिव सुनीलजी राठोड,सचिव रमेश आडे,उद्योजक श्री रमेश राठोड,कोषाध्यक्ष श्री  राजू जाधव ,इंजि श्री

राजेश चव्हाण,वरीष्ठ श्री तुळशीराम राठोड,अर्जुनचव्हाण,उत्तमराठोड ,कार्यकर्ता योगेश,संभा ,कैलासजी चव्हाण ,अनिल राठोड सर कल्याण,आत्माराम चव्हाण,कल्याण,शिवाजी चव्हाण व श्री पंडित राठोड, निलेश राठोड इतर मान्यवर उपस्तीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व नियोजन श्री शेषमल सर यांनी सुरेख केले

श्री सुखलाल चव्हाण यांनी प्रशाविक तसेच प्रभोदन करताना

सांगितले कि बंजारा समाज निसर्ग पूजक आहे

तिज महोत्सव  हा कौटुंबिक सोहळा साजरा करण्याचे उद्धेश हा कि ज्या मुली लग्नाच्या आहेत जर हे पूजन केले तर त्यांना संस्कारित वर प्राप्त होतो तसेच लग्न झालेल्यांनी तिज पूजा केली तर अखंड सौभाग्य लाभते ,हा श्रावण चा महिना आहे सगळी कडे निसर्ग बहरलेला असतो तसे

संसारात देखील बहर येतो

मा मारोती राठोड यांनी समाजास प्रोभोदन करताना समाजा पुढील आव्हान व त्यावर उपाय या बद्दल विचार मांडले

मा श्री राजू नाईक यांनी या प्रसंगी प्रोभोदन करताना सांगितले कि हा सन पारंपारिक वेशभूषा करून साजरा करावे,घरात गोर बोलीचा वापर करावा तसेच समाजाच्या समस्या अनेक आहेत ती लढाई लढण्या करिता रस्त्यावर सोट्या घेऊन उतरावे लागेल,

आमदार श्री किसनराव कथोरे यांनी महिलां रिंगण करून फेर धरून नृत्य करताना बघितले व कौंतुक केले तसेच मुलींना आशीर्वाद दिले  भाषणात त्यांनी समाजास येणाऱ्या स्थानिक अडचणी करिता सदैव हजर राहील व पुढील वर्षी नियोजनात सक्रिय राहील असे सांगतील

सौ संगीता चव्हाण यांनी हि प्रोभोदन पर विचार मांडताना सांगितले कि पुढील वर्षी उत्तीर्ण विद्यार्थयांचे कौंतूंक  सोहळा आयोजित करावे अशा सूचना दिल्या

सोहळ्यास 500 भगिनी व बांधव उपस्थित

होते  भव्य दिव्य मिरवणूक नाच गाण्या सह

ढोल ्ताशा च्या गजरात काढण्यात आली व

संध्या 7 30 दुबे बाग येथे विसर्जन करण्यात

आले,
श्री सुखी चव्हाण , बदलापूर

9930051865
सौजन्य: गोर कैलास डी राठोड

बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र