मुंबई समाचारः-दि.02/8/2017 व दि.03/8/2017 “बंजारा समाजसाठी केंद्रामध्ये आरक्षणा” बाबत दिशा व मार्गदर्शन पर दोन दिवसीय चर्चा सत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय मुंबई येथे आँल इंडिया बंजारा राऊंड टेबल काँन्फरन्स (“नसाब”) पुर्वसांसद व विधायक(महाराष्ट्र) मा.आ.हरीभाऊ राठाेड यांनी आयाेजीत केली हाेती. कार्यक्रमास मा.मुख्यमंत्री(म.रा.) देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्राचे उदघाटन मा.ना.रामदासजी आठवलेसाहेब, केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री(भारतसरकार) प्रमुख उपस्थिती ,मा.ना.संजयभाऊ राठाेड,महसुल राज्यमंत्री, (म.रा.) मा.ना.महादेवजी जानकरसाहेब पशू संवर्धन मंत्री़ (म.राज्य)तसेच मा.ना.राजकुमार बडाेलेसाहेब सामाजीक न्याय मंत्री(म.राज्य), मा.आ.प्रदीप नाईक, मा आ. मनोहर ऐनापुर कर्नाटकराज्य ,मा.शंकरजी पवारसाहेब(विकासक) मुंबई; उत्तमसिंग चव्हाण, मा. शिवमुर्ती, जागिरसिंग वडतीया, पंजाब ,मा.आ.बाबुराव नाईक तेलंगणा,श्री लावडीयाजी सह आयुक्त;श्री गोविंद राठोडसाहेब माजी आयुक्त Adv रमेशभाऊ राठोड इतर वरिष्ठ आजी व माजी अधिकारी तसेच देशातील प्रत्येक राज्यातून विविध संघठनेचे प्रमुख पदाधिकारी,पत्रकार व बंजारा समाज बांधव बहूसंख्येने उपस्थीत हाेते.काँन्फरन्स मध्ये आे.बि.सी.संवर्गातीत आरक्षणाचे प्रमाण 9:9:9 या रेशीओप्रमाणे देण्याच्या द्रुष्टीकोणातून तसेच इतर महत्वाच्या विषयावर सर्वंकष चर्चा झाली. कार्यक्रम फलित म्हणजे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देशातील समस्त बंजारा समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या व सरकार सर्वोतोपरी सकारात्मक राहील असे आश्वासन सभेला दिले !! कार्यक्रमाची सांगता होत असतांना मा.पंकजाताई मुंडे मंत्री ग्राम विकास व बालकल्याण(म.रा.)हयांची उपस्थिती महत्वपूर्ण बाब म्हणता येईल.मा.पंकजाताईनी सभेला संबोधीत केले व सर्वतोपरी पुर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.तसेच “तांडा वस्ती” सुधार योजनेत लक्ष देण्याचे आश्वासन दिले. देशाभरातील उपस्थित सर्व राज्या तील विविध संघटनेचे अध्यक्ष/प्रमुख पदाधिकारी हयांनी “एकमताने”मा.हरिभाऊजी राठोडसाहेब हयांचे नेतृत्वाखाली काम करण्याची सभागृहाची मंजूरी दिली आहे.व सर्वच प्रमुख पदाधिकारी हयांनी महाराष्ट्र व देशपातळीवर मा.हरिभाऊजी राठोड यांचे नेतृत्वास संपूर्ण व भक्कम समर्थन केले आहे. तसेच सभागृहाने मा.हरिभाऊजी राठोड हयांनी बंजारा समाजासाठी केलेल्या अविरत कार्यासाठी व त्यागासाठी त्यांचा “गौरव” केला.सर्व नेत्यांनी दोन दिवस दिलखुलास चर्चा केली,व एकमताने निर्णय केलेत. एकूणच”आॅल इंडिया बंजारा राउंड टेबल काॅन्फरन्स” कार्यक्रम संपूर्णतः यशस्वी झालेला आहे !!
जय सेवालाल ! जय गोरबंजारा !!
देवेंद्र पवार मुंबई
Tag: All India Banjara Round Table Conference Mumbai, CM Devendra Fadanvis, Ex MP Haribhau Rathod