यवतमाळ (प्रतिनिधी): भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या वतीने पल्लवी लॉन, आर्णी रोड, यवतमाळ येथे सर्वशाखीय बंजारा समाजातील युवक-युवतींचा राज्यस्तरीय परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवीका श्रीमती अनुताई राठोड होत्या. मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्यचे महसूल राज्यमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहकार नेते ऍड. शंकरराव राठोड, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.टी.सी. राठोड, राजाराम जाधव (मुंबई), महाराष्ट्र प्रदेशचे माजी कार्याध्यक्ष नवलकिशोर राठोड तर मंचावर डॉ. मोहन राठोड, डॉ. सुरेश मुडे, भाऊराव नाईक, पुरण राठोड, डी.जी. पवार, दे.जो. राठोड, सुभाष राठोड, मोहन जाधव, वसराम नाईक, टि.व्ही. राठोड, डॉ. बळीराम राठोड उपस्थित होते. मेळाव्यात 65 युवक व 110 युवतींनी आपला परिचय दिला. तसेच याची नोंद परिचय पुस्तीकेत घेण्यात आली आहे. प्रास्ताविक नवलकिशोर राठोड यांनी केले. संचालन प्रा. नरेश जाधव तर आभार गणेश चव्हाण यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे पदा धिकारी नवलकिशोर राठोड, डॉ. बळीराम राठोड, टि.टि. जाधव, बी.सी. राठोड, जवाहर राठोड, यशवंत राठोड, नारायण आडे, शेषराव आडे, राजु चव्हाण, बी.पी. जाधव, वसंत राठोड, अनिल राठोड, संतोष चव्हाण, गणेश चव्हाण, व्ही.डी. राठोड, प्रा. पी.आर. चव्हाण, शेखर राठोड, राजु चव्हाण (मुख्याध्यापक), अभिमान राठोड, कैलास चव्हाण, देवराव चव्हाण, पंडित आडे, पोपसिंग राठोड व सुधाकर जाधव यांनी परिश्रम घेतले.