“बंजारा समाजाची औळख”

राजा भोगेरे सभा ।
पचारे लाख न पचारे सव्वा लाख ।।
सगा से आनंcद भाई से कसव।
कसव कसव आनंद आनंद।।

उदयपुर जवळील छोटी सादडी भागात इ.स. ३०० वर्ष गोर वंशीयाचे राज्य होते (इ.स.११०९ ते १८०९) त्याचा शिलालेख सापडला आहे. तर पिलीभिती बरेली डोंगराल भागात दलपत शहा बंजारा राज्य करीत होता. तर झावुआ गोर राजा आजच्या छत्तीसगड प्रातांत राज्य करीत होते. असे कित्येक पुरावे इतिहासात सापडतात राजे महाराजे, सामंत, सेनापतीच्या शुरविरांचा यौध्दा बलीदान त्यागाचा दानशुर पणाचा इतिहास बंजारा जमातीचा आहे. देशाची राजधानी दिल्ली वर गोर बंजारा हेमु भुकिया यांनी ३० दिवस राज्य केल्याचे संदर्भ आहेत.(इ.स.१६१३) तसेच बंगाल प्रातांत इ.स. ६०० ते ६३८ या कालावधीत शशांक सोमला नावाचा राजाने ३० वर्ष राज्य केले आहे. गोरवंशीय आला उदल ची शौर्य गाथा आजही बुंदेलखंड मध्ये गायली जाते. परमाल रासो नावाच्या रासो ग्रंथात आला उलदनी लदलेल्या बावीन युध्दाचे वर्णन ऐकतांना अंगावर शहारे उभे राहतात. राजा उदयसिग राज्य सोडुन जंगलात निघुन गेला त्याचे सर सेनापती जयमल व फत्ता (इ.स.१५६७) नी कित्येक दिवस चित्तोडगड अकबराच्या ताब्यात जावु दिला नाही. त्यामुळे राजा अकबरांनी जयमल- फत्ताची शुरता विरता प्रत्यक्ष युध्दात पाहिली असे शुर व प्रामाणिक राजभक्त असावे म्हणुन त्यांनी जयमल -फत्ताची पुतळे (स्मारक) त्या किल्याच्या समोर अकबरांनी उभे केली आहे. गोरा बादल गोर बंजारा शुर सेनापतीनी राणी पदमिनीचे पावित्र्य नष्ट होऊ दिले नाही.असे कित्येक एका पेक्षा एक रण वाकुर गोर बंजारा समाजात होऊन गेले आहेत. गुरु तेग बहादुर चा अंत संस्कार करणारा लकी शहा बंजारा शीख इतिहासात अमर होवुन गेला आहे. रकाबगंज गुरुव्दारा त्याची साक्ष देत दिल्लीत उभा आहे. इंग्रजाच्या विरुध्द बंड करणारा गोंबिद गीर बंजारा राजस्थान , गुजराथ चा भिल्ल समाजामध्ये अम��
  झाला आहे.
जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुध्द यांनी सर्व प्रथम भिक्षु तपसु या बंजाराना बौध्द धर्माची दिशा दिली हा सन्मान गोर बंजारा समाजाचा आहे. व्यापारात लदेणी व्यवसायात बंजाराचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. जेव्हा भारतात बारा वर्षाचा दुष्काळ पडला त्यावेळी बंजारानी चीन ब्रम्ह देशातुन अन्नधान्य आणुन देशवाशियांचे प्राण वाचविले असे पुरावे ऐन अकबरी या ग्रंथात सापडतात. सैन्याला रसद पोहचवण्याचे काम अतिशय प्रामाणिक पणाने बंजारानी केली आहेत. देशात हजारो विहरी (कुंड) तलाव बंजारानी बांधकामाचे पुरावे आहेत. लक्की शहा ची वावडी प्रसिध्द आहे. मोगल वजीर असरफ खान नी बंजाराची रसद पोहचवण्याची कामगिरी पाहुन बंजाराना ताम्रपट दिला होता. त्यावर खालील प्रमाणे लिहले होते.
रंजन का पानी छप्पर का घास।
दिनके तीन खुन माफ ।।
जहॉ जंगी भंगी बैल खडे ।
वहॉ असरफ खॉ के घोडे रुखे ।।

लदेणी रसद व्यवसायामध्ये बंजारा समाजाचे
एकेकाळी नाव होते रसद आणिh लदेणी चे मुख्य केंद्र दिल्ली होते. त्या ठिकाणी १२५० एकर जमीन रायसिंग नाईकांच्या तांडयाची होती. आजचे संसद भवन, राष्ट्रपती भवन हे बंजाराच्या जागेवर उभे आहे. ती जमीन ९९ वर्षाच्या लिजवर इंग्रजानी रायसिंग नाईकाकडुन संसद भवनसाठी इ.स.१९११ साली घेतली होती. त्या लिजची मुदत पण सद्यस्थितीत संपली आहे. रायसिना म्हणुन ओळखला जाणारा १२५० एकर जमीन रायसिंग नाईकांच्या तांडयाची मालकीची होती. याच जमीनीवर गुरु तेग बहादुर यांचा अंत्य संस्कार अग्नी देऊन करण्यात आले होते. हा सगळा इतिहास म्हणजेच बंजारा समाजाची ओळख आहे. बंजारा समाजाला ५००० वर्षाचा इतिहास आहे.

सर्वधर्म समभाव- बंजारा धर्म :-
बंजारा मुळात प्रकृतीपुजक (पृथ्वी, जल, अग्नी, वायु, ) देवी पुजक (सप्त देवी), पितृ पुजक आहेत. तांडा धाडी, बाणी, बाणो,यातुन वरील धर्म यांच्या सिध्द होतो. रुग्वेदामध्ये प्रकृती देवी , पितृ पुजेचा विभिन्नता मध्ये वर्णन आले आहे. त्याच आधारे त्यांना इतर समाज हिंदु समजतो. त्यामुळे ते हिंदु आहेत. आजही वयोवृध्द माणसाला विचारले की तुझा धर्म काय आहे. तर तो म्हणतो माझा धर्म गोरमाटी आहे.आजही तो स्वतःला गोर समजतो तर इतर कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला तो कोर समजतो.
बदलत्या परिस्थितीमुळे आज देशातील बंजारा बौध्द हिंदु शीख, इसाई, धर्मात देखील दिसुन येत असला तरी रोटी बेटी व्यवहार आपसातील मुळात गोर बंजारा जमाती मध्येच होतो. त्यामुळे सर्वधर्म समभाव बंजारा समाजामध्ये दिसुन येते. देखा देखी आलिकडे हिंदुचे सर्व सण त्यौहार जरी तो साजरे करीत असला तरी बंजारा समाजाचे प्रत्येक सण जसे तीज, दसराव, दिवाळी , हे आपले पांरपारीक सण बकरा बळी दिल्याशिवाय पुर्ण होत नाहीत. त्यात मासांहार करतांना गुडीवालो हाडका याला विशेष महत्व आहे. तसेच दारुची शिशी मान सन्मानाने प्रतिक बंजारा समाजात मानले जात ��
गुरु पंरपरा
बंजारा गोर वंशीय मध्ये वेगवेगळे शंभर ते सव्वासे वेगवेगळे गोत्र पाडा असले तरी हेमा गुरुचे स्मरण पुर्ण समाज करतो गुरु मंत्र वदाई संस्कार झाल्याशिवाय मुलाचे लग्न होत नाही. गुरु बाबा सदा सदा असा जप करतात. लग्नात शुध्दा नवरदेव गुरुच्या नावाने प्रसाद वाटतो त्याशिवाय लग्न विधी पुर्ण होत नाही. हेमा गुरु जोधपुर , नागपुर च्या डोंगराळ भागात स्वामी बाबा, गुरु नानकाला शिख झालेले बंजारा श्रध्दास्थानी मानतात. पण त्यांचा धर्म गुरु हेमा गुरुच आहे.(जो शंकर भगवान चा भक्त होता ) त्यामुळे शीव पार्वतीचे (गणगोर) महत्व बंजारा समाज धार्मीक दृष्टया महत्वाचे मानले जाते शिवशंकर आर्यपुर्वी देवता असुन पुढे आर्य आणि अनार्यानी सुध्दा महादेवांना देव म्हणुन स्विकारले आहे. म्हणुन मी म्हणतो गोर वंश प्रायः आर्य वंशीय आहेत. हा सर्व प्राचीन इतिहास अज्ञात राहील्यामुळे विशेषतः उत्तर भारतातील बंजारा स्वतःला रजपुत वंशीय समजतात ते चुकीचे आहे. रजपुत वंशच मुळात आठव्या शतकात निर्माण झाला (शकहुन) तर गोर बंजारानां ५००० वर्षाचा इतिहास आहे. राजपुत आणि बंजाराची सस्कृतीच वेगळी आहे. राजपुत यांच्याशी रोटी -बेटी व्यवहार करीत नाहीत अज्ञानामुळे काही प्रांतातील बंजारा राजपुत म्हणुन घेतात ते चुकीचे आहे. गोर बंजारा राजपुत नाहीत
शेवटी बंजारा समाजाची ओळख म्हणजे माणसानी माणुस म्हणुन कसे जगावे त्याचे जगाला मार्गदर्शन करणारा बंजारा समाज त्याची एकताराची धुन…..
   – एक बंजारा गाये ।
जिवन के गीत सुनाये ।।
सब जीने वालो को ।
जिने की राह बताये….एक बंजारा ।।”

image