बंजारा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास राष्ट्रीय बंजारा टायगर्स रास्तारोको आंदोलन करणार

प्रति.
मा.देवेंद्र फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
मुंबई .
‘द्वारा-जिल्हाधिकारी………….’

बंजारा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास राष्ट्रीय बंजारा टायगर्स रास्तारोको आंदोलन करणार

———————-
       मुंबई येथील आझाद मैदान येथे दि.१८ मार्च रोजी गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती आयोजित व बंजारा समाजाचे धर्मगुरु संत तपस्वी रामरावजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात बंजारा समाजातील सर्व संघटनांनी सहभाग घेतला असुन महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या,शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागणण्या,व संपूर्ण देशात एकच भाषा, एकच बोली,एकच वेशभुषा व एकच संस्कृती,चालीरीती जपणारी एकमेव जगात गोर (बंजारा) असूनही वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात या समाजाला विभागून ठेवले आहे.
      आजपर्यंत अनेक सामाजिक संघटनांनी वेगवेगळी आंदोलने करुन सरकारचे डोळे उघडण्याचे प्रयत्न केले.परंतु सत्तेत येणारया सरकारने आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी खोटेे आश्वासना व्यतीरिक्त या समाजाला काहीच दिले नसुन निव्वळ फसवणूक केली आहे.व बंजारा समाजावर अन्याय केला आहे.
                “बंजारा जमातीला अनुसुचित जमातीत समाविष्ठ    करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडुन केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी,”VJNT या वर्गात मिळण्यात येणाञा सवलती बंद केले आहे. सरकारी नौकरी करणाञा कर्मचाञांची पदोन्नती वरही बंदी लावण्यात आली असुन,सरकारने बंदी उठवावी,बंजारा (VJNT) यांना लावलेली क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी,मॅटने दिलेला निकाल रद्द करुन पदोन्नतीबाबत नविन जी.आर काढण्यात यावे,प्रत्येक तांड्याला महसुली दर्जा व स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुर करणे,तांडा विकास योजना फक्त तांड्यासाठी राबवावी व तांडा विकास महामंडळ स्थापन करण्यात यावा.गोर बंजारा भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावे,बंजारा विमुक्त भटक्यांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतुद करण्यात यावी,वसंतराव नाईक महामंडळाकरीता १,००० कोटींची तरतुद करण्यात यावी व अध्यक्ष म्हणून बंजाराचाच असावा.बंजारा जमातीची जनगणना करणे,स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्यात यावा,तसेच आंध्र, कर्नाटक व उत्तर प्रांतातून आलेल्या बंजारा बांधवांना आरक्षणाची सवलत देऊन क्षेत्रीय बंधन रद्द करण्यात यावा व ( जातीचा दाखला पुरावा करीता सन १९६१ पूर्वीची अट रद्द करणे),बांधकाम कामगार, नाका कामगार,उसतोड कामगार, मच्छी कामगार तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सोयी-सवलती उपलब्ध करुन देण्यात यावी, भूमीहिन, बेरोजगार युवक युवतींसाठी जमीन, उद्योगधंद्यासाठी स्वस्त दराने कर्ज उपलब्ध करुन देणे, बंजारा भवन उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जागा व निधी उपलब् करुन देणे, सदगुरु सेवालाल जयंतीची सुट्टी जाहीर करण्यात यावी,वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, बंजाराची शैक्षणिक व आर्थिक गुणवत्ता वाढावी व शासन प्रशासनात भागीदारी घेण्यासाठी सक्षम व्हावे यासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी हाॅस्टेल, स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात यावी, तसेच शाळा,काॅलेजमध्ये प्रवेश घेतांना फी माफ करण्यात यावी व एससी,एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी आदि अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
        परंतू शासनाची या मागण्या संदर्भात उदासिनता दिसत असून पंधरा दिवसात बंजारा समाजाबद्दल निर्णय न घेतल्यास राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने “महाराष्ट्रभर”तीव्र आंदोलन छेडण्यात येइल. पुढील संपुर्ण परिणामाची जबाबदारी सरकारची असेल असे राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष  मा. आत्मारामभाऊ जाधव यांच्या वतीने आम्ही खाली सही करणार आपणास निवेदन देत आहोत
       🙏आपला स्नेहांकित.🙏
श्री……………………
जिल्हाध्यक्ष , …………..