अंबाजोगाई – वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी
संघटना शाखा अंबाजोगाई यांच्या हस्ते बंजारा
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव
मा.आ.विक्रमजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्री
श्रीराम चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नरेंद्रजी
काळे तर मार्गदर्शक म्हणून श्री
मोहन जाधव, अध्यक्ष, वसंतरावजी नाईक अधिकारी
कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती
होती.
मा.आ.विक्रमजी काळे म्हणाले की, बंजारा
समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती
केली पाहिजे, शिक्षणाशिवाय समाज प्रगतीच्या दिशेने
वाटचाल करणार नाही, त्यांनी उदाहरणावरून
शिक्षणाचे महत्व पटवून सांगीतले.
बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश
करावा, या मागणीच्या संदर्भात बोलतांना
आ.विक्रमजी काळे म्हणाले की, मी मुंबईला गेल्यानंतर
पूर्ण माहिती मिळवून आपल्या मागणीचा पाठपुरावा करीन,
असे आश्वासन दिले. डॉ.श्रीराम चव्हाण यांनी
वसंतराव नाईकांच्या जीवनावर प्रकाश टाकला व
त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन
केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पंडित चव्हाण यांनी केले.
स्वागत प्रा.संजय राठोड, श्री विष्णुं राठोड, श्री देविदास
पवार यांनी केले. संचलन डॉ.तिरनजीत पवार व आभार
श्री यशवंत आडे यांनी केले. कार्यक्रमासाठी बंजारा
समाजातील त्री, पुरूष मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री रामराव आडे, श्री प्रकाश
राठोड, सुनिल राठोड, विनय राठोड, गोरक्षनाथ राठोड,
यशवंत चव्हाण, विक्रम चव्हाण, ऍड.प्रकाश राठोड,
श्री रामराव जाधव आदिंनी परिश्रम घेतले.