मुंबई/कारंजा(रितेश पवार/सचिन अशोक राठोड) :-बंजारा समाजातील पहिल्या महीला पदवीधर तथा शिक्षिका व समाजसुधारक चंद्रकला रणजित नाईक वय ८० वर्षे यांचे अल्पशा आजाराने नाशिक येथे निधन झाले.चंद्रकला नाईक यांचा जन्म थोर समाजसुधारक,दलीत मित्र,
स्वतंत्र सेनानी बाबुसींह राठोड यांचे धाकटे बंधू रतनसिंह दगडुसिंह राठोड यांच्या परिवारात झाला.१९५५ च्या दशकात समाजाला शिक्षणाचा गंधही नव्हता त्यावेळी स्त्री शिक्षणाची कल्पना न केलेलीच बरी पण अश्याही परिस्थिती विविध समस्या नां तोंड देत चंद्रकला नाईक पदवीधर होऊन शिक्षणशास्त्र विषयात पदवी मिळवून रामप्यारी नगर परिषद कन्या शाळा कारंजा(लाड)येथे शिक्षीकीपेक्षा स्विकारून ज्ञानदानचे कार्य केले.
त्यानंतर त्या प्रख्यात वास्तूविशारद तथा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष रणजित नाईक यांच्याशी विवाहबद्ध झाल्याने त्यांना नोकरी सोडून मुंबई येथे स्थायीक व्हावे लागले. त्यांनी शिक्षणासाठी अनेकांना मुंबई येथे बोलवून शिक्षणासाठी मदत केली त्यांनी केलेल्या मदतीमुळे अनेकजण आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत.त्यानी गोर बंजारा पाक्षीकाचे संपादन करून बंजारा समाजाच्या समस्या आणि संस्कृती यावर विपुल लेखन केले आहे.त्याच्या पश्चात भाऊ भिमसिंग राठोड,अर्जन राठोड (विकासक मुंबई)मोहन राठोड (चार्टर अकांउटन अमेरिका,मुले सुना नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.वसंतराजवूत्तसेवा