बंजारा समाजासाठी कार्य करणाय्रा “सामाजिक संघटना” यांची बैठक

🙏जय सेवालाल🙏
दि.८’फेब्रुवारी २०१५-रविवार रोजी ” मराठी ग्रंथ संग्रहालय-ठाणे ” येथे महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजासाठी कार्य करणाय्रा “सामाजिक संघटना” यांची बैठक पार पडली.
       या बैठकीमध्ये समाजातील प्रलंबीत समस्या व प्रश्नांवर चर्चा झाली,आणि सर्व संघटना मिळून या सर्व प्रश्नांवर तिव्र लढा देण्याचे ठरले.
        आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते “गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती” स्थापन करण्यात आली.आणि या समितीमध्ये सर्व संघटनांचे-३-३ प्रतिनिधी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमार्फत “दि१८’मार्च २०१५-बुधवार” या दिवशी एक “भव्य महामोर्चा” चे आयोजन “मुंबई येथील विधानभवनावर” करण्याचा अतिषय महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
         तरी कृपया सर्व संघटनांनी या महासमिती मधे सामिल होवून हा “महामोर्चा” यशस्वी करावा,आणी आपल्या समाजातील सर्व “संविधानिक हक्क/मागण्या” सोडविण्यास शासनास भाग पाडावे.
                    असे आवाहन “गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती” मार्फत करण्यात येत आहे.
    🙏आपले नम्र 🙏
🌷🌹बंजारा सेवक🌹🌷
१).श्री.आत्माराम सुरसिंग जाधव(सदस्य-‘गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती’ तथा “राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय बंजारा टायगर्स”)
२).श्री.अॅड.अविनाश जाधव(सदस्य-‘गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती’ तथा ‘राष्ट्रीय प्रवक्ता-राष्ट्रीय बंजारा टायगर्स’)
३).श्री.अशोक हिरामण चव्हाण.
‘सदस्य-गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती’ व ‘प्रदेश सरचिटणीस-राष्ट्रीय बंजारा टायगर्स,महाराष्ट्र प्रदेश’.(संपर्क-09595423655/08080144260).