“बंजारा समाज सुधारक” :पद्मश्री रामसींगजी भानावत (Padmshree Ramsing Bhanawat)

Ramsingh Bhanawat

*बंजारा समाज सुधारक*

*१)पद्मश्री रामसिंग भानावत*

श्री. रामसिंग भानावतजी चा जन्म फुल उमरी जि.वाशिम
( महाराष्ट्र ) येथे दिनांक १५ ऑगस्ट १९०६ रोजी एका गरीब परिवारात झाला गरीबीचे कारण त्यांनी इयत्ता पाचवी पर्यतचे शिक्षण घेवुन शकले ते संत सेवालाल महाराजांचे सेवक नरसिंग भानावत (भाट) यांचे नातु होत. नरसिंग भानावत भाट चांगले कवी होते. ते आपल्या सुस्वर बाणीने गायनाने सेवालाल महाराजांना प्रभावित करीत होते. त्यांच्या चातुर्थ आणि विव्दतेच्या वारसा श्री. रामसिंग भानावतजींना मिळाला फुलउमरी येथील प्राथमीक शाळेत ते वसंतराव नाईकाच्या संपर्कात आले.नाईक साहेब उच्च शिक्षणासाठी अमरावती व नागपुरला गेले.
श्री. रामसिंग भानावतजींना शिक्षणाबरोबर सामाजिक कामाची जोडी होती. भारत स्वतंत्र व्हावा असा अंदोलन चालु असतांना विदर्भात चालु असलेल्या तीव्र अंदोलनास भानावत जी आकर्षक -ााले. जमिनदार विरुध्द शेतकरी मजुरांनी तीव्र अंदोलन अभारले त्यावेळी दादा धर्माधिकारी व आचार्य विनोबा भावे यांच्याशी त्यांची भेट झाली  त्यांचा मार्ग त्यांनी विदर्भ कुल सेवा संघ या संस्थेची स्थापना केली या संस्थेची स्थापना त्यांनी स्वतंत्रसैनिक बाबुसिंग भाऊ राठोड यांच्या सहकार्याने उभारली त्यावेळी अंदोलन करणे आणि इंग्रजाविरुध्द संघ स्थापन करणे म्हणजे मरणाला आमंत्रण देणे होते. त्या भितीची पर्वा न करता आदरणीय बाबुसिंग राठोड आणि भानावतजी यांनी विदर्भ कुल सेवा संघाची स्थापना केली . तसेच दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनासाठी कसेल त्यांची जमीने ही घोषणा केली आणि शेत मजुरांना न्याय मिळवुन दिला.
त्या काळी स्वातंत्र्य प्राप्ती साठी अनेक समाज सुधारक आकर्षित झाले. या अंदोलनाच्या मार्गातुन त्यांनी प्रेरित होवुन महात्मा गांधी , डॉ.बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहु महाराज यांच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यांच्या अंदोलनात सक्रीय झाले.  सत्ता संपत्ती पासुन ते अलग राहिले काही उदाहरण आमच्या समोर आहे.
१. ते स्वातंत्र्य सेनानी होते. परंतु स्वातंत्र्य सेनानीनां मिळणाऱ्या मानधन त्यांनी कधीही घेतले नाही.
२. ते महाराष्ट्र राज्यातील पहिल दलित मित्र होते. सन १९७१ रोजी त्यांना विना प्रस्तावाने मिळाला या पुरस्कारा सोबत मिळालेली रक्कम त्यांनी  बांगले देशातील शरणार्थीच्या निधीत जमा केली.
३. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, मा.सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरणेने त्यांना पद्श्री पुरस्कार प्राप्त झाला श्री. भानावतजी व्रत धारी समाज सेवक या नात्याने अनेक मागासलेल्या संस्थेचे ते पदाधिकारी होते. १९८० पर्यत अखिल भारतीय सेवा संघाचे ते महासचिव होते. मा.वसंतराव नाईक मुख्यमंत्री पदावर असतांना त्यंानी अनेक ग्रामीण योजना राबविणे बाबत सल्ला दिला. सन १९८० नंतर त्यांनी युरोप सह अनेक देशांचा दौरा केला बंजारा समाजाच्या उत्पत्ती बाबत संशोधन आणि अभ्यास करुन विश्वबंजारा समाज सांस्कृतिक शोधपीठ नावाची संस्था स्थापन केली.
भानावतची यांनी त्यांच्या काळात बहुतेक साहित्य संशोधन प्रतिक्षेत आहे.आदरणीय भानावतजी चे व्यक्तीमत्व इतके प्रभावित होते. मोठ मोठे विचारवंत त्यांच्या मतप्रणालीशी सहमत होते. सत्ता , संपत्ती ,किर्ती निरपेक्ष जिवन जगणाऱ्या या महान आत्माच्या आचार विचारांना त्यांचे कार्य हमेशा समाजात अमर राहील.
????????????????????????
*संकलन-*
प्रा.दिनेश सेवा राठोड व समस्त कार्यकारीणी मंडळ,
*वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ*
क्रमशा *

सौजन्य: गोर कैलास डी.राठोड
एडीटर बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल’
Website:www.banjaraone.com

image

Tag: Banjara Samajsevak, Padmshree Ramsing Bhanawat Jayanti