*भाग–१*
*बंजारा साहित्य संमेलन- काही वास्तव व अपेक्षा*
✍प्रा.दिनेश एस.राठोड
(कोव्हळा तांडा, दारव्हा)
(ह– मलकापूर)
भारतात मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा समाजाचे अस्तित्व अतिशय प्राचीन आहे. या समाजातील साहित्याचे संशोधन, जतन व संवर्धन करण्याची ख-याअर्थाने गरज आहे.आज अनेक संमेलने जसे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, मुस्लिम साहित्य संमेलन व विद्रोही साहित्य संमेलन ,गुराखी संमेलन ,विमुक्ताचे संमेलन व अशा धर्तीवर बंजारा समाजाचे अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलन आयोजन होत आहे.त्यान्वये काही सामाजिक न्यायदर्शक महत्त्वाचे बाबींचा सर्वसमावेशक उहापोह होणे अपेक्षित आहे.
लोककलांपासून लोकसाहित्यापर्यंतचा व मौखिक साहित्याचा समृध्द वारसा बंजारा समाजाने जतन केला आहे. प्रस्थापित साहित्य परंपरेत आपल्या समाजाच्या साहित्याला न्याय मिळालेला नाही. फार कमी प्रमाणात समाजाच्या दुःखाचे चित्रण अनेकांनी साहित्य निर्मितीत केल्याचे दिसते. समाजाच्या जाणीवा व्यक्त करण्यासाठी व साहित्यात योग्य स्थान मिळवून देण्यासाठीचे आमचे साहित्य अपूरे आहे. आमच्या साहित्यकांनी ही बाब प्रकर्षाने लक्षात घेण्याची गरज आहे. हे बंजारा साहित्य संमेलन असल्याने इतर साहित्या- सह बंजारा साहित्यच संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असावी. आज बंजारा साहित्य पाहिजे तसे परिपक्व झालेले नाही. आमच्या मौखिक साहित्यास मोठ्या प्रमाणात वाव मिळेल अशा देशभरातुन आलेल्या प्रगल्भ कलावंतास व साहित्य कास संमेलनात मोठे स्थान मिळायला हवे.तसे नियोजन होत असेल तरच ते अखिल भारतीय बंजारा संमेलन ठरेल.लग्न गीते, विवाह संस्कारगीते ,होळीतील लेंगी, कलापथक भजने ,स्त्रीविषयक संवेदना (आमची म्हातारी डोकरी )आमची संस्कृती खरे तर हे आमचे अस्सल साहित्य आहे. संमेलनात या साहित्याची मेजवानी व्हावी सकल भारतातील बंजारा कलावंतास, साहित्यकास पाचारन करने महत्वाचे आहे सर्वव्यापी संमेलन असे म्हटलं तर ते 1 महिन्याच्या तयारीने कसे शक्य आहे . आपल्या साहित्य संमेलानाचा अंतर्गत विचार हा तांड्या- तांड्या पर्यंत कसे पोहचेल याचा अग्रक्रमाने विचार व्हावा वअसावा व तसे नियोजन करण्यासाठी तांडा स्तरावरील कार्यकर्त्यांची फळी पासुन ते शहरात असेलेल्या प्रतेकांचा तन मन व धनाने हेरेरिने सहाभाग कसे होईल याचा विचार प्राधान्याने व्हावा असे वाटते.केवळ दहा विस बांधवांनी घेतलेल्या मिटिंगने ते कसे शक्य आहे. तांडा ते शहरापर्यत यान्वये कार्यास वाहुन घेतलेल्या समविचारी बांधवाची फळी तयार व्हावी,
तांडां व शहरात क्रमाक्रमाने सभेचे नियोजन व्हावे, गोरधर्म व गोरविचाराची झालरच आपल्या संमेलनाचे यथार्थ दर्शन घडवेल,कारण आमचे खरे साहित्य तांड्यात आहे, नागपूर सारख्या शहरात
कितपत प्रतिसाद मिळेल ?ही वेळच ठरवेल.त्यामुळे बंजारा बहुल जिल्हा प्रांत व गावपातळीवर समेलन झाल्यास ते यशस्वी होईल.
आज वेगवेगळे जातीसमूह देशात आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेतून चळवळी सुरू आहेत.आम्हि वेगवेगळ्या चळवळीत काम करतोय मात्र गोर वीचार चळवळीस पूरेशी शक्ती खर्च करण्यात आम्ही शिकलेली मंडळी यापासुन कोसो दुर गेल्याचे चित्र समोर आहे, सामान्य माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे, आज अनेक प्रकारची संमेलने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात होत आहेत. अशा संमेलनांचा इतिहास लिहल्या जात आहे. मग आमचे साहित्य संमेलन खेड्यात पार पाडल्या जात नाही का ? आपल्या संमेलनांमधून गोर वहिवाटीचा समतुल्य विचार प्रस्थापित करण्याचीच खरी गरज आहे. याचबरोबर आपल्या आपल्या साहित्यास विशिष्ट चौकटित न मांडता अखिल गोर बंजारा पातळीवर असे विचार पोहोचविले तरच संमेलनाचे नियोजन व यशस्विता सार्थ ठरेल.
*क्रमशः भाग 2 वर*
गोर कैलास डी राठोड