“बंजारा” ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात आह- Banjara History

बंजारा” ही महाराष्ट्रातील हिन्दू
धर्मातील एक जात आहे. सुमारे चार-पाचशे
वर्षापुर्वी या समाजानेचित्तोडगड राजस्थानातुन वेगवेगळ्या राज्यात स्थलांतर केले. हा समाज मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक,गुजरात मध्यप्रदेश,उत्त रप्रदेश,छत्तीसगड, राजस्थान, हरियाना, पंजाब,जम्मू-काश्मीर व गोवा या भागांत कमी जास्त लोक्संख्येने पसरलेल्या या जातीतील लोक प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज. भारतात व अन्य देशांतही आढळतो.भारतात विविध राज्यात सर्व समाजांसोबत मिळून मिसळून राहणारा
शेतकरी पशुपालक समाज उपेक्षित राहिल्याने
प्रगती थांबलेला समाज जाती व्यवस्थेचे चटके इतर क्षत्रिय समाजापेक्षा सर्वात जास्त सोसलेला समाज. या कारणाने एन.टी.किंवाविमुक्त जाती/भटक्या जमाती आरक्षण मिळण्याने आज उभारत असेलेला
समाज पण इतर क्षत्रिय समाजाकडून क्षत्रिय
असूनही मान न मिळालेला समाजबंजारा समाजाचा त्यागाचा शौर्य पराक्रमाचा इतिहास आहे.बंजारा/लमाण,गोर समाज हा क्षत्रिय
वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा
बलशाली व कडवट लढाऊ गट आहे.महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा औरंगजेब भेटी वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:च्या सोबत निवडक लोकांमध्ये बंजारा लोक निवडण्याचे कारणही हेच कि बंजारा समाज हा क्षत्रिय बलशाली व कडवट लढाऊ बाण्याचा आहे .तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेबांच्या माहेरगावी शिंदखेड राजा परिसरातील हजारो बंजारा तरुण मावळे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात
सहभागी होते . तसेच राजस्तानात महाराणा प्रताप जेंव्हा दिलीच्या पातशहा सोबत एकाकी लढत होते तेव्हाही हाच बंजारा समाज तेथे आपले शौर्य पराक्रमाचा इतिहास उभारत होता कारण महाराणा प्रताप यांचे
प्रमुख सरदार अल्ला-ऊदल,लाखा बणजारा,सोमाहे निष्ठेने लढत होते त्यांच्या समाध्या उदयपुर किल्ल्यात आजही उभ्या
आहेत. बंजारा हा क्षत्रिय वंश असेलेला महाराणी दुर्गावती १० लाख बैल वापरून संपूर्ण भारतात विविध राजांना युद्धात दारुगोळा शस्त्र व मीठ मसाला अन्नधान्य
पुरवठा करत असे. क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा बंजारा समाज हा तत्कालीन समाज धुरिणांनी भटका या बिरुदाने बाजूला टाकला व काळाच्या ओघात आपली मूळ ओळख विसरून एक उपेक्षित समाज म्हणून पुढे चालत गेला. आणि आजही उपेक्षित राहिला आहेआज मालवाहु रेल्वे,
ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापुर्वी पुरातन
काळापासुन ही मालवाहतुक/मालपुरवठा करणारा एक मोठा समाज फक्त ’बन-जा-रहा’ ज्याला आपण महाराष्ट्रात बंजारा म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वन चर…याचेच रुपांतर “बन जा रहा” या शब्दात झाले असे एक मत इतिहासात डोकावुनपाहता दिसते. या आद्य मालवाहतुकदारांचा…मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे.पुरातन काळी भारतात अरण्ये
खुप होती. बैलगाड्या जावू शकतील असे
फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश. भुगोलही विचित्र. प्रचंड पर्वतरांगा. अलंघ्य नद्यांची रेलचेल. क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट…पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे एका राज्यातील माल दुस-या राज्यांतील नागरिकांच्या गरजांसाठी/व्यापा-यांसाठी वाहतुक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधु संस्क्रुतीच्या कालापासुनच भारतात नैसर्गिक ते कृत्रीम बंदरे बनु लागली होती. या बंदरांतुन विदेशात माल निर्यात केला जायचा तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे ते आयात माल देशात इच्छित
स्थळी पोहोचवण्याची सुविधानसती तर या आयात-निर्यातीचेकाम अशक्यप्राय असेच होते.हे तत्कालीन सुविधांचा पुरेपुर अभाव पाहता विविध समाजघटकांतील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग
नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात
केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले
सैन्यासाठी दारुगोळा असे पदार्थ बैलांवर
शिस्तशीर लादुन ते वेगवेगळ्या ठिकाणी
पोहोचवले जावू लागले. तिकडुन मीठ,तेल,कडबा व जिवनावश्यक माल बैलांवर लादुन आनला जावू लागला. त्याचबरोबर हे
बंजारा स्वत: व्यापारही करत.आजचे घाट, रस्ते हे मुळच्या बंजारा मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारांसाठी मूळचाच क्षत्रिय लढवैय्या
बंजारा समाज सज्ज होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती- जमातींशी, अगदी परकिय
व्यापा-यांशीही नित्य संपर्क येत असल्याने
बंजा-यांची एक स्वतंत्र व वैशिष्ट्यपुर्ण
संस्कृतीही बनत गेली. वेष,भाषा,बोली देव (सेवा-सामका) इतर कोणत्याही समाजापासुन वेगळे पडल्याने एक स्वतंत्र मानसिकता…भटकेपणाची नैसर्गिक उर्मी
यातुन त्यांचे स्वत:चे संगीत..(थाळी-नंगारा)
भजन,लेंगी फागण तीज काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व
स्वाभाविक असेच होते. बंजारा तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/भाट,ढाडी/
ढालिया,कलापथक नाटक कारां द्वारे होत होते,आजही तुरळक पणे होताक. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदरवर्णन करुन ठेवले आहे.बंजारा समाजाचे कार्य फक्त नागरी व
व्यापा-यांसाठीचा मालपुरवठा करणे येथेच संपत नाही. या समाजाचे राजव्यवस्थांसाठीचे
सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्धकाळात सैन्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे. हे काम बंजारा समाज पुरातन कालापासुन
करत आला असला तरी तत्कालीन युद्धे
नजीकच्याच सीमावर्ती राजांशीच शक्यतो होत असल्याने सैन्यासाठीच्या अन्नधान्य
वाहतुकीची व्याप्ती कमी होती. पण पुढे युद्धांचा परिसर विस्तारत गेला. मध्ययुगात इस्लामी सत्ता आल्यानंतर सतत युद्धायमान परिस्थिती जशा बनत गेल्या तसतसे या
क्षेत्रातील बंजारा चे योगदान वाढत गेले. महिनोनमहिने सैन्याचे तळ एकेका ठिकाणी पडत. सैन्य असो कि बाजारबुणगे, शाश्वत अन्नधान्य पुरवठ्याशिवाय जगणे शक्य
नव्हते. सैन्य पोटावर चालते हे म्हणतात ते खोटे नाही. वाटेतला मुक्काम असो कि
युद्धभुमीवरील, बंजारा तांडे अन्नधान्य
पुरवठा अव्याहतपणे करत असत. वेळ प्रसंगी
खंबीरपणे लढण्यांस सज्ज होत, दहापाच सहज लोळवून शंभर कत्तल करणारा समाज कोणत्या अशा विशिष्ट बाजुसाठीच पुरवठा करत नसल्याने, तटस्थ असल्याने बंजा-यांवर कोणताही पक्ष बळजबरी करत नसे वा हल्ले करुन त्यांची लुटमारही करत नसे याचे कारंण म्हणजे त्यांच्या अस्तित्वाखेरीज युद्धे लढता येणे अशक्य आहे याची जाणीव सर्वांनाच असे. सैन्याला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम अगदी ब्रिटिशकाळापर्यंत चालु होते. चेउल येथील बंदरात हजारो बैलांचे बंजारा तांडे येत असत, याची नोंद कोलाबा ग्यझेटियरने केलेली आहे. अनेक बंजारांना मोगलांनी वतने दिली असल्याच्याही नोंदी मिळतात.थोडक्यात अठराव्या शतकापर्यंत मालवाहतुक, फिरता व्यापार यात बंजारा,लमाण,गोरसमाजाचे प्राबल्य होते. परंतु ब्रिटिशकाळात रस्ते बनु लागले. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीची आधुनिक साधने
आली व वाहतुकीचा वेगही वाढला. रेल्वेने तर पुरती क्रांतीच घडवली. बैलांच्या पाठीवर सामान लादुन भ्रमंती करनारा तांडा समाज दूर फेकला जावू लागला. त्याची गरजच संपुष्टात आली. चार-पाच हजार वर्ष अव्याहतपणे भटकत राहुन व्यवसाय करणारा समाज यामुळे एका विचित्र वळनावर आला. स्थिर होणे भाग पडले. ही सक्तीची स्थिरता होती. मग डोंगर पायथे, कडा,दरी,नदी जवळ करुन तर काही शेतीकडे वळाले, तर काही मोलमजुरीकडे. नंतर ऊस-तोड व आता बांधकाम,रस्ते निर्माण,शेती कार्य वगैरे…क्षत्रिय
वंशातुन निर्माण झालेला हा समाज भारतीय
संस्कृती कोषात क्षत्रिय वंशाची भटकी जात असा उल्लेख सापडतो. ब्रिटीशांनी गुन्हेगार ठरवून D.Notifide/ Non Tribe चा शिक्का मारला.तो स्वातंत्र्यानंतर ही तसाच आहे, भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यांत अनुसूचित जमात व काही राज्यांत अनुसूचीबाहेर असलेली ही एके काळची भटकी जमात. यांची वस्ती प्रामुख्याने राजस्थान, आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब व बिहार , मध्य
प्रदेश, महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांत आढळते. अनेक बंजारा स्वत:ला मारवाड/राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या
वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही. त्यांच्यात अनेकउप जाती/ जमातीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त
जातीचा डाग दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते लंबाडा सुगाळी, दिल्लीत लमाण शिरकिवन,राजस्थान व केरळात बन-गवरिया व गूजरातमध्ये चारण-’बन-जा-रहा’ म्हणून
ओळखले जातात. लोदी घराण्यातील
सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा वन बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. एन.एफ. कंबलीज याने या जमाती संबंधीचे संशोधन प्रथम प्रसिध्द केले. त्यांच्या मते बंजारा यांच्या प्रमुख चार आडनावे आहेत..चव्हाण,राठोड,पवार व जाधव नंतर नाईक ही पदवी तद् नंतर आढे-मुढे आहेत, हरावत,खोला,पालथिया, वडत्या,लाव्हडिया,आमगोत,लुणसावत,अजमेरा, झरपला वगैरे. विविध प्रांतीय लोक असल्याने सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. बंजारा समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील बंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजेसेवा भाया, सामकी याडी, सामत
बाबा,तुळजाभवानी, गिरजादेवी, गुरु नानक,आणि बालाजी या समाजातुन उदयाला आलेले थोर संत म्हणजे जगदगुरु सेवालाल महाराज. बंजारा समाजाची सेवा भाया वर अपार श्रद्धा आहे.आजचे वास्तवआज महाराष्ट्रातील मुठभर गर्भ श्रीमंत लोक सरकारीअधिकारी कर्मचारी व्यावसाईक सोडले तर बंजारा समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे. आज काही प्रमाणात शेती तर असंख्य बंजारा
उसतोडणी,शेत मजूर,रस्ते व ईमारत बांधकाम,गिरणी कामगार म्हणुन राबत आहेत. आर्थिक स्थिती ही अत्यंत दुर्बळ
झालेली आहे. आजही हा समाज स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आजही शिक्षणाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद वाशिम, अकोला जिल्ह्यांत बंजा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याचे कारण म्हणजे औरंगाबाद हा प्रगत विभाग असूनही येथे
नेतृत्व न मिळाल्यामुळे ऐरे गैरेंच्या जी-
हुजरीतच धन्यता मानणारे समाजाचे पुढारी
स्वत:ची तुंबडी भरण्यातच लयास गेले.
मराठवाडा म्हणजे देवगीरी सातवाहन ते
यादव काळापर्यंत व्यापाराची मध्यवर्ती
केंद्रे होती. वसंतरावानी जे समाजासाठी केले मध्येच सुधाकरांनी खुर्चीसाठी गहाण टाकले.

आज बंजारा समाजाला सापत्नभावाची वागणुक मिळते आहेहेही तेवढेच सत्य आहे. ही स्थिती कशी बदलवायची हे
आपल्या सर्वच समाजासमोरील आव्हान आहेआज इतिहासाची नवीन मांडणी करत
आहेत स्वत:वरच्या अन्यायाचा विरोध करत आहोत पूर्वी इतिहास लिहताना बंजाऱ्याचे क्षत्रियत्व मुद्दाम उपेक्षिले आता काय, हे पाहणे महत्वाचे आहे आणि हजारो वर्षाचा उपेक्षित पणा झटकून पुन्हा तेजस्वी इतिहास निर्माण
करण्याचा निर्धार करुन पेटुन ऊठा..गोर बंजारा,लढवैय्याक्षत्रिय छां हम्,-“ऊष:काल होता होता,काळरात्र झाली..अरे पुन्हा
आयुष्याच्या पेटवा मशाली…!!”
Tag Banjara History